मुलींच्या नावाने सेक्शुअल चॅट, नंतर ब्लॅकमेलिंक करत लाखोंची मागणी, अशा नराधमांपासून सावध राहा

ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये सध्या प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फ्रॉड करणाऱ्या भामट्यांना जेरबंद करणं पोलिसांपुढेही मोठं आव्हान असतं.

मुलींच्या नावाने सेक्शुअल चॅट, नंतर ब्लॅकमेलिंक करत लाखोंची मागणी, अशा नराधमांपासून सावध राहा
प्रातिनिधिक फोटो

जयपूर : ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये सध्या प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फ्रॉड करणाऱ्या भामट्यांना जेरबंद करणं पोलिसांपुढेही मोठं आव्हान असतं. पण राजस्थान पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. राजस्थानच्या भरतपूर येथून सर्वसामान्यांना ऑनलाईन लुबाडणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या रॅकेटने देशातील तब्बल 15 राज्यातील नागरिकांना ऑनलाईन लुबाडलं आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात पोलिसांनी 100 पेक्षा जास्त भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. हे भामटे लोकांशी ऑनलाईन चॅट करायचे. त्यानंतर ब्लॅकमेलिंग करुन फसवायचे.

अशिक्षित असूनही ऑनलाईन फ्रॉड करुन कोट्यवधी कमावतात

विशेष म्हणजे या गँगमध्ये सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वचजण अशिक्षित आहेत. तरीदेखील ते लोकांची ऑनलाईन फसवणूक करुन दर महिन्याला 10 ते 20 लाख रुपये कमवतात. हे भामटे मुलीच्या नावाची फ्रेंड रिक्वेस्ट लोकांना पाठवायचे. त्यानंतर त्यांच्याशी सेक्शुअल चॅट करायचे. नंतर भावनांमध्ये गुंतवून अश्लील व्हिडीओ कॉलही करायचे. त्यानंतर पैशांसाठी ब्लॅकमेलिंग करायचे.

आरोपी कशाप्रकारे ब्लॅकमेल करायचे?

“तुमचं मुलीसोबत सेक्शुअल अॅक्टिव्हिटी करतानाचे क्षण आम्ही कॅमेऱ्यात कैद केले आहेत. आता संबंधित व्हिडीओ आम्ही युट्यूबवर टाकू. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल होईल. जगभरातील लाखो लोक तो व्हिडीओ बघतिल. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होऊ नये, असं वाटत असेल तर पैसे द्या”, अशा प्रकारची मागणी या भामट्यांकडून केली जायची. अखेर काही जण भामट्यांच्या धमकीला बळी पडायचे आणि ते पैसे द्यायचे.

भामटे एकदा वापलेलं सीम पाण्याच्या बाटलीत टाकतात

आरोपी या माध्यमातून तब्बल 10 ते 50 लाख रुपये महिन्याला कमवतात. विशेष म्हणजे एकदा लुबाडल्यानंतर ते सीम पाण्याच्या बाटलीत टाकून देतात ज्यामुळे पोलीस त्यांच्या सीमचं लोकेशन ट्रेस करु शकत नाहीत. याशिवाय आरोपी स्वत:च्या राज्यात असे गैरप्रकार करत नाहीत. ते पूर्व, दक्षिण किंवा मध्य भारतातील राज्यांमधील नागरिकांना लुबाडतात, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे.

OLX द्वारे देखील नागरिकांची फसवणूक

आरोपी फक्त सेक्शुअल चॅट द्वारेच नाही तर ओएलएक्सवर देखील लोकांना ऑनलाईन लुबाडतात. ते स्वस्तात गाडी विक्रीचं आमिष दाखवतात. तसेच आपल्या प्रोफाईलला ते आर्मीशी संबंधित अनेक फोटोही ठेवतात. त्यामुळे काही भोळ्या व्यक्तींचा त्यांच्यावर विश्वास बसतो. त्यातून ते अनेकांना लाखोंचा चुना लावतात.

हेही वाचा : दारुड्या काकाचा सात वर्षांच्या पुतणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्थानिकांकडून चोप

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI