खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खोटे आरोप; ब्लॅकमेल करणाऱ्या ‘ त्या ‘ महिले विरोधात अखेर गुन्हा दाखल

| Updated on: Jul 16, 2022 | 6:48 PM

खासदार शेवाळे यांनी 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर, आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे, खासदार शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे या आरोपांखाली साकीनाका पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खोटे आरोप; ब्लॅकमेल करणाऱ्या  त्या  महिले विरोधात अखेर गुन्हा दाखल
Follow us on

मुंबई :  खासदार राहुल शेवाळे(MP Rahul Shewale) यांना धमकाविणाऱ्या महिलेविरोधात अखेर मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने या महिलेने खोटे आरोप केले होते.  अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सदर महीलेविरोधात साकीनाका पोलिसांनी एफ आय आर नोंदवला असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या एफ आय आर बाबत समाधान व्यक्त करून हा सत्याचा विजय आहे, अशा शब्दांत खासदार शेवाळे यांनी  प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार शेवाळे यांनी 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर, आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे, खासदार शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे या आरोपांखाली साकीनाका पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरापासून खोट्या आरोपांमुळे मी आणि माझ्या कुटुंबीयांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले हे षडयंत्र असल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश लवकरच करेन, असे मी याआधीच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले असल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगीतले.

माझी बाजू न्यायालयापुढे मांडली आणि अखेर साकीनाका पोलीस ठाण्यात सदर महीलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सत्याचा विजय आहे. यापुढे पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील याची मला खात्री आहे.