
गणेश सोळंकी, बुलढाणा : प्लॉट खरेदीच्या व्यवहारात फसवणूक तसेच खंडणी (Extortion) उकळल्या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस (buldhana police station) ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य तीन आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी प्रकाश दराडे, गजानन मोरे, दत्तात्रय नागरे आणि विशाल पंडितराव मोहिते, अजय रामसिंग परदेशी, शुभम जीवन पांडे अशी आरोपींची नावं असून यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. प्लॉट खरेदीचा व्यवहार प्रकरणात 40 लाख उकळल्याचा आरोप (buldhana police Extortion) त्यांच्यावर करण्यात आला आहे.
या सर्व आरोपींविरोधात जालना जिल्ह्यातील राजूर येथील मयूर हाजबे यांनी तक्रार दिली होती. बुलडाणा शहरातील धाड नाका परिसरात मयूर हाजबे यांना प्लॉट खरेदी करून देतो म्हणून या आरोपींनी विश्वासात घेतले. इसार पावतीचे 4 लाख रुपये देखील आरोपींनी घेतले होते. त्यानंतर मात्र मयूर हजबे यांना प्लॉट बाबत झुलवत ठेवण्यात आले. मात्र मयूर हाजबेला पैसे परत करावे लागेल, त्यामुळे आरोपींनी शक्कल लढवत त्यालाच अवैध बंदूक बाळगल्या प्रकरणात जेलमध्ये टाकण्याचा सापळा रचून भीती दाखविण्याचे ठरले आहे.
आरोपी पोलिसांनी शुभम पांधे याला मध्यस्थी ठेवून याप्रकरणी पोलिस प्रकाश दराडे, गजानन मोरे यांच्यासह दत्तात्रय नागरे यांच्या मदतीने षडयंत्र रचण्यात आले. मयूर हाझबेला गजाआड करण्याची भीती दाखवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्याच्याकडून रिकामा बॉण्डपेपर, रिकामा चेक आणि इतर कागदपत्रे देखील घेण्यात आली.
आरोपी शुभम पांडे यांचे बँक अकाउंट 20 लाख रुपये टाकण्यात आले आणि चेक बाऊन्स झाला असल्याचे दाखवत त्यावर खोटी सही करून पुन्हा 20 लाख रुपये उकळण्यात आले. या सगळ्या प्रकरणात या तिन्ही पोलिसांनी आरोपींना मदत केली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी प्रकाश दराडे, मोरे ,नागरे आणि विशाल पंडितराव मोहिते, अजय रामसिंग परदेशी, शुभम जीवन पांडे सर्व राहणार धाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.