मोबाईलने तिला आयुष्यातून उठवलं! हेडफोन लावून गाणे ऐकत चालली होती, पण एक चुक तिच्या जिवावर बेतली

| Updated on: Jan 06, 2023 | 8:36 AM

इगतपुरी तालुक्यातील जाणोरी येथे एका चुकीने मुलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. मोबाईलवर गाणे ऐकणे मुलीच्या जिवावर बेतले आहे.

मोबाईलने तिला आयुष्यातून उठवलं! हेडफोन लावून गाणे ऐकत चालली होती, पण एक चुक तिच्या जिवावर बेतली
Image Credit source: Google
Follow us on

शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी ( नाशिक ) : माणसाची एक क्षुल्लक चुक आपल्याला मृत्यूला कारण ठरू शकते अशी एक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीचा अपघाती मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जानोरी गावाजवळ ही घटना घडली आहे. इगतपुरी महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रियंका नामदेव कोकणे असे 17 वर्षीय विद्यार्थीनीचे नाव आहे. महाविद्यालयात जाण्यासाठी प्रियंका घरातून इगतपुरीच्या दिशेने चालली होती. प्रियंका पायी चालत असतांना मोबाईलला हेडफोन लावून गाणे ऐकत होती. घरापासून प्रियंका दररोज काही अंतर हे पायी चालत असल्याने हेडफोनवर गाणे ऐकत जाण्याची दररोज तिला सवय होती. जानोरी रेल्वे फाटकाजवळून चालत असतांना प्रियंकाच्या कानात हेडफोन तसेच होते, गाण्यांचा आवाज मोठा असल्याने तिला ट्रेनचा आवाज आलाच नाही. आणि ट्रेनची धडक बसल्याने प्रियंकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मोबाइलवर गाणे ऐकत असल्याने ट्रेनचा आवाज न आल्याने तिला ट्रेनची धडक बसून तीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना परिसरात समजल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रेल्वे फाटक ओलंडतांना सतर्क राहून, दोन्ही बाजूला पाहून आणि विशेष म्हणजे गेट बंद असल्याने रेल्वे ट्रॅक ओलांडने धोकादायक मानले जाते असे असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करणे प्रियंका कोकणे या तरुणीच्या जिवावर बेतले आहे.

हे सुद्धा वाचा

कदाचित मोबाइलवर हेडफोन लावून गाणे ट्रॅक ओलंडतांना बंद केले असते, किंवा कमी आवाजात जरी गाणे ऐकत असती तर प्रियंका आज वाचली असती अशी चर्चा आता इगतपुरी तालुक्यात होऊ लागली आहे.

इगतपुरी महाविद्यालयातील या तरुणीचा असा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक घरी जाण्याचा सल्ला शिक्षकांकडून दिला जात आहे.