शेतात राखण करायला गेलेल्या तरुणाचा मृतदेहच आढळला, ‘या’ कारणामुळे तरुणाला संपवले

कुटुंबीयांनी घटनेची माहिती मिळताच सर्व जण शेतात पोहचले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात सोनूचा मृतदेह पडला होता. नातेवाईकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

शेतात राखण करायला गेलेल्या तरुणाचा मृतदेहच आढळला, या कारणामुळे तरुणाला संपवले
सहा दूध उत्पादकांना अटक
Image Credit source: Google
| Updated on: Nov 05, 2022 | 8:54 PM

महोबा : शेतात शौच करण्यास मनाई केली म्हणून एका माथेफिरुने तरुणाची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे गावात स्मशान शांतता पसरली आहे. सोनू विश्वकर्मा असे हत्या करण्यात आलेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तर राजकुमार राजपूत असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. महोबा जिल्ह्यातील कॅथोरा गावात ही घटना घडली आहे.

शेतात शौच करण्यास केली होती मनाई

मयत सोनूचे वडिल जीत विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सोनूने राजकुमारला शेतात शौच करण्यास मनाई केली होती. यावरुन राजकुमार आणि सोनू यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. त्यावेळी राजकुमारने सोनूला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

यानंतर राजकुमार खूप चिडला होता. सोनूविषयी त्याच्या मनात प्रचंड खुन्नस निर्माण झाली होती. काल रात्री सोनू शेतात राखण करण्यासाठी गेला होता. यावेळी राजकुमार कुऱ्हाडीने वार करुन त्याची हत्या केली.

शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

कुटुंबीयांनी घटनेची माहिती मिळताच सर्व जण शेतात पोहचले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात सोनूचा मृतदेह पडला होता. नातेवाईकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

यानंतर चौकशी दरम्यान पोलिसांना राजकुमारने हत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ आरोपी राजकुमारला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

याआधी महिलेची झाली होती हत्या

महोबा याआधी काही दिवसांपूर्वी 50 वर्षीय महिलेची घरात घुसून कुऱ्हाडीने वार करत हत्या करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी महिलेची मुलं शेतात राखण करण्यासाठी गेले होते.