मुलाला शेवटचे पाहण्याची ८५ वर्षीय आईची इच्छा, इतक्या महिन्यांनी झाली इच्छापूर्ती

| Updated on: May 31, 2023 | 10:11 PM

मोहम्मदच्या मृत्यूची बातमी ऑगस्ट महिन्यात भारतीय दुतावासाला मिळाली. कागदपत्र आणि लंब्या कारवाईनंतर सोमवारी संध्याकाळी जेद्दावरून आलेला मृतदेह १४ महिन्यांनंतर घरी पोहचला.

मुलाला शेवटचे पाहण्याची ८५ वर्षीय आईची इच्छा, इतक्या महिन्यांनी झाली इच्छापूर्ती
Image Credit source: socialmedia
Follow us on

लखनौ : एकीकडे मुलाच्या मृत्यूचे दुःख. दुसरीकडे मुलाला शेवटचे पाहण्याची इच्छा. ८५ वर्षीय आईचे अश्रृ पाहणाऱ्याचे मन हेलावून जाते. ही कहाणी आहे उत्तर प्रदेशातील शाहजहापूरची. कोतवाली क्षेत्रात राहणाऱ्या मोहम्मद आलम नावाच्या व्यक्तीच्या आईची. मोहम्मद सौदी अरबच्या जेद्दा येथे काम करण्यासाठी गेला. ३० मार्च २०२२ ला त्याचा मृत्यू झाला. मोहम्मदच्या मृत्यूची बातमी ऑगस्ट महिन्यात भारतीय दुतावासाला मिळाली. कागदपत्र आणि लंब्या कारवाईनंतर सोमवारी संध्याकाळी जेद्दावरून आलेला मृतदेह १४ महिन्यांनंतर घरी पोहचला.

मोबदला नाकारला

मार्च २०२२ मध्ये ३५ वर्षीय मोहम्मद आलमचा जेद्दा येथे मृत्यू झाला. त्याच्या ८५ वर्षीय आईची एकच इच्छा होती. ती म्हणजे मुलाला शेवटचं पाहण्याची. त्यामुळे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रस्ताव तिने नाकारला.

 

हे सुद्धा वाचा

अंतीम संस्कारासाठी आईचे दुःख

आई मरीयमचे म्हणणे होते की, मी आपल्या मुलाला शेवटचं पाहू इच्छिते. आता पार्थिव शरीर जेद्दावरून लखनौला आणण्यात आला. अँबुलन्सने सोमवारी शाहजहापूरला पोहचला. मोहम्मदची पत्नी त्याच्यावर तिथेचं अंतीम संस्कार करण्यास तयार होती. परंतु, मोहम्मदच्या आईची मुलाला शेवटचे पाहण्याची इच्छा होती. राजकीय नेते तसेच अधिकाऱ्यांनी मुलाला भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते.

२०१३ मध्ये सऊदीत गेला होता मोहम्मद

मोहम्मद आलमच्या मोठा भाऊ आफताबने सांगितले की, २०१३ मध्ये मोहम्मद हा अरबला गेला होता. परतला होता. परंतु, कोरोनानंतर परत जेद्दा येथे गेला. ३० मार्च २०२२ ला मोहम्मदचा मृत्यू झाला. याची माहिती २४ ऑगस्ट रोजी दूतावासाला मिळाली.

१४ महिन्यांनंतर मिळाला मृतदेह

मोहम्मद यांचा मृतदेह १४ महिन्यांनंतर जेद्दा येथील रुग्णालयात पडून होता. कुटुंबीयांनी मृतदेह परत आणण्यासाठी मोठी लढाई लढली. सध्या मोहम्मदला मेहमानशाह कब्रस्तानाता दफन करण्यात आले.