मॉलमध्ये चॉकलेट चोरताना पकडले, मग फोटो व्हायरल झाले; तणावातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

| Updated on: Nov 01, 2022 | 4:00 PM

जयगाव सुभाषपल्ली राहणारी पूजा घोष 29 सप्टेंबर रोजी आपल्या लहान बहिणीसोबत मॉलमध्ये खरेदीसाठी गेली होती. शॉपिंगदरम्यान तिने तेथील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून चॉकलेट चोरले.

मॉलमध्ये चॉकलेट चोरताना पकडले, मग फोटो व्हायरल झाले; तणावातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
मानसिक तणावातून कॉलेज तरुणीची आत्महत्या
Image Credit source: google
Follow us on

कोलकाता : मॉलमध्ये चॉकलेट चोरताना पकडल्यानंतर तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मानसिक तणावातून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अलीपुरद्वार येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेली होती तरुणी

जयगाव सुभाषपल्ली राहणारी पूजा घोष 29 सप्टेंबर रोजी आपल्या लहान बहिणीसोबत मॉलमध्ये खरेदीसाठी गेली होती. शॉपिंगदरम्यान तिने तेथील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून चॉकलेट चोरले. मात्र तिला चॉकलेट चोरताना तिला कर्मचाऱ्यांनी पाहिले.

यानंतर पूजाने चोरीची कबुली देत माफी मागितली आणि चॉकलेटचे पैसेही दिले. मात्र तरीही मॉलमधील कर्मचाऱ्यांनी तिचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला.

हे सुद्धा वाचा

फोटो व्हायरल झाल्याने मानसिक धक्का बसल्याने पूजाची आत्महत्या

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर पूजाला मानसिक धक्का बसला. बदनामी झाल्यामुळे ती मानसिक तणावात राहू लागली. याच तणावातून तिने रविवारी राहत्या आत्महत्या केली.

स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल

स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या अहवालाची वाट पाहत आहेत.

ग्रामस्थांचे मॉलबाहेर आंदोलन

आरोपी मॉल कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करत गावकऱ्यांनी मॉल आणि पोलीस स्टेशनबाहेर निदर्शने केली. पूजाचा फोटो व्हायरल करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणीही ग्रामस्थांनी केली. आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी पोलिसांनी दिले.