Aurangabad | गंगापूरमधून गायब झालेल्या तरुणीचा मृतदेह दोन दिवसांनी नदीत सापडला, आत्महत्या की घातपात? गूढ कायम!

11 जून रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात तरंगताना नागरिकांना दिसला. नागरिकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली.

Aurangabad | गंगापूरमधून गायब झालेल्या तरुणीचा मृतदेह दोन दिवसांनी नदीत सापडला, आत्महत्या की घातपात? गूढ कायम!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 12, 2022 | 5:36 PM

औरंगाबादः दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडलेल्या 22 वर्षीय तरुणीचा अखेर मृतदेहच पोलिसांना सापडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील (Gangapur Taluka) बाबरगाव येथील ही तरुणी 09 जूनपासून बेपत्ता (Girl Missing) होती. कुटुंबियांच्या तक्रारीनुसार पोलीस संबंधित परिसरात तिचा शोध घेत होते. मात्र 11 जून रोजी औरंगाबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील जुना कायगाव टोका येथील गोदावरी (Godawari river) नदीपात्रात तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. हे पाहून नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली. मृत तरुणी दिव्या दंडे ही  22 वर्षांची होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. घरातून एकाएकी गायब झालेल्या तरुणीनी आत्महत्या केली की तिच्याबाबत काही घातपात झालाय, याचा तपास घेण्यांचं आव्हान पोलिसांसमोर आहे. सध्या तरी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दोन दिवसांपासून बेपत्ता

सदर, घटनेबाबत अधिक माहिती अशी की गंगापूर तालुक्यातील बाबरगाव येथील  22 वर्षीय तरुणी दिव्या ही  09 जूनपासून घरातून बेपत्ता होती. रात्री उशीरापर्यंत ती घरी न आल्याने पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार केली. तेव्हापासून तिचा शोध सुरु होता.

कुजलेल्या स्थिती मृतदेह

दरम्यान, 11 जून रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात तरंगताना नागरिकांना दिसला. नागरिकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर तिची ओळख पटली. सदर तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. नातेवाईकांच्या परवानगीने पोलिसांनी डॉक्टरांमार्फत तिचे शवविल्छेदन केले.

नैराश्यातून आत्महत्या?

सदर तरुणीने एका जवळच्या व्यक्तीच्या विरहाचे स्टेटस ठेवून आत्महत्या केली असावी, अशी चर्चा परिसरात सुरु आहे. मात्र पोलीस किंवा कुटुंबियांकडून याबाबत काहीही भाष्य करण्यात आलेले नाहीत. येत्या काही दिवसात पोलीस या प्रकरणाचा उलगडा करतील.