विश्वासातील नोकराकडून विश्वासघात, 53 लाखांचे हिरे-दागिने लंपास, 24 तासात नोकराला अटक

| Updated on: Feb 12, 2021 | 7:02 AM

या नोकराने तब्बल 53 लाख 80 हजार रुपयांचे दागिने आणि हिरे लंपास केले होते.

विश्वासातील नोकराकडून विश्वासघात, 53 लाखांचे हिरे-दागिने लंपास, 24 तासात नोकराला अटक
Follow us on

मुंबई : भांडुपमध्ये सराफा मालकाचा विश्वासघात करुन सोन्याचे दागिने आणि हिऱ्यांची चोरी (Employee Theft Gold Ornaments And Diamonds) करणाऱ्या नोकराला पोलिसांनी अवघ्या 24 तासात गजाआड केलं आहे. भांडुप पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली. या नोकराने तब्बल 53 लाख 80 हजार रुपयांचे दागिने आणि हिरे लंपास केले होते (Employee Theft Gold Ornaments And Diamonds).

नेमकं काय घडलं?

भांडुप पश्चिमेला अंकित कोठारी यांचा हिरे तसेच सोन्या-चांदीचे दागिने बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात गेल्या दोन वर्षांपासून विपीन मकवाना नावाचा व्यक्ती कामाला होता. त्याच्यावर कोठारी यांचा विश्वास असल्याने तयार केलेले हिरे किंवा इतर दागिने ते विपीनच्या हस्ते सराफा दुकानदारांना पाठवत असत.

नेहमी प्रमाणे 8 फेब्रुवारीला विपीन 53 लाख रुपयांचे दागिने कोठारी त्यांच्याकडून घेऊन सराफा दुकांदाराना देण्यासाठी निघाला पण खूप वेळ होऊन तो परत न आल्याने त्यांनी भांडुप पोलिसात तक्रार दिली. उच्चाधिकाऱ्यांकडून सूत्रे हलली आणि पोलिसांनी 3 पथक तयार केली. सर्व सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाजू तपासून आरोपी गुजरातच्या अहमदाबाद येथे गेल्याचं प्रथमदर्शनी दिसले. पोलीस अहमदाबादला पोहचले. पण, आरोपी विपीनच्या लक्षात आले की, पोलीस आपला पाठलाग करत आहेत. तो पुन्हा मुंबईत आला आणि ठाण्याच्या नौपाडा विभागात असलेल्या वन खात्याच्या कार्यालयाजवळ लपला असा सुगावा लागला (Employee Theft Gold Ornaments And Diamonds).

पोलिसांनी कौशल्य पणाला लावून त्याला 24 तासाच्या आत अटक केली आणि चोरलेली संपूर्ण मालमत्ता म्हणजे 53 लाख 80 हजाराचे दागिने हस्तगत केले, अशी माहिती परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.

Employee Theft Gold Ornaments And Diamonds

संबंधित बातम्या :

नागपूरमध्ये ब्रँडेड खाद्य तेलाच्या डब्यातून भेसळयुक्त तेलाची विक्री, प्रशासनाची धडक कारवाई

मुंबईच्या धडाकेबाज पोलिसांची दणकेबाज कामगिरी, तीन दिवसात दहा कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळल्या

आठ जणांची नावं लिहून सांगलीत सराफाची आत्महत्या