सायको किलर्सचा बेछूट गोळीबार; दहाहून अधिक नागरिक गंभीर जखमी

| Updated on: Sep 13, 2022 | 10:23 PM

सायको किलर दुचाकीवरून आले होते. या गुन्हेगारांनी दुचाकीवरून खाली उतरल्यानंतर मागेपुढे न पाहता अंधाधुंद गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.

सायको किलर्सचा बेछूट गोळीबार; दहाहून अधिक नागरिक गंभीर जखमी
मृत्यूनंतर 18 महिने केले नाही अंत्यसंस्कार
Image Credit source: tv9
Follow us on

बेगुसराय : बिहारच्या बेगुसरायमध्ये सायको किलर (Psycho Killer) गुन्हेगारांनी मंगळवारी संध्याकाळी प्रचंड दहशत माजवली आहे. या गुन्हेगारांनी राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी गोळीबार (Firing) केला आणि एका तरुणाची हत्या (Murder) देखील केली. त्यांच्या अंधाधुंद गोळीबारात जवळपास दहाहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांवर विविध खासगी नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत.

दुचाकीवरून आले आणि निष्पाप नागरिकांवर गोळ्या झाडल्या !

सायको किलर दुचाकीवरून आले होते. या गुन्हेगारांनी दुचाकीवरून खाली उतरल्यानंतर मागेपुढे न पाहता अंधाधुंद गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. अवघ्या 40 मिनिटांमध्ये त्यांनी दहा जणांवर बेछूट गोळीबार केला.

बछवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोधना येथून त्यांनी गोळीबार सुरू केला. पुढे चकिया ओपीच्या थर्मलपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला. बेगुसरायमध्ये घडलेली आतापर्यंतची गोळीबाराची ही भीषण घटना असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पुढील तपास सुरु

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने गोळीबाराच्या घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे. त्या फुटेजमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एक तरुण पिस्तुलाने गोळीबार करताना दिसत आहे.

गोळीबाराची माहिती मिळताच संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. बचवाडा येथून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगारांची ओळख पटवली जात आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक तरुणांवर केला गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालतीजवळील पिपरा देवास येथील रहिवासी असलेल्या चंदन कुमारला गुन्हेगारांनी गोळ्या घातल्या. त्याला उचलून बरौनी येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.

उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यापाठोपाठ आणखी एका तरुणावर सराईत गुन्हेगारांनी गोळ्या झाडल्या. त्यात त्या तरुणालाही गंभीर दुखापत झाली आहे.

एकूण चार तरुणांवर गोळ्या लागोपाठ गोळ्या झाडण्यात आल्या. भर चौकात केलेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

भीषण गोळीबारात जखमी झालेल्या अनेक तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे. त्यामुळे गोळीबारात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हल्लेखोर कोठून आले? त्यांनी अचानक गोळीबार का सुरु केला? यामागे कुठली टोळी सक्रिय आहे का? अशी विविध प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे.