AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी, घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर…

रात्री ९ वाजता एका मोटारसायकलचा धक्का लागला, त्यामुळे तिथं दोन्ही बाजूची लोकं जमा झाली. दोन्ही ग्रुपमध्ये बाचाबाची झाली. वाद टोकाला गेल्यानंतर हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे.

क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी, घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर...
khamgaon police stationImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 02, 2023 | 3:03 PM
Share

बुलढाणा : खामगाव (Khamgaon) तालुक्यातील चितोडा (Chitoda) येथे रात्री 9 वाजेच्या सुमारास मोटर सायकलचा (Motorcycle) धक्का लागल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन काही जण जखमी झाल्याची घटना घडली. खामगाव ग्रामीण पोलीस (police station) ठाण्यात दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेख रिहान शेख अहमद याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 13 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. तर दुसऱ्या तक्रारीत गौतम महादेव तिडके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख रीहान शेख अहमद यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

सध्या गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा

हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी हे मोठ्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. सध्या गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा असून परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय झालं

रात्री ९ वाजता एका मोटारसायकलचा धक्का लागला, त्यामुळे तिथं दोन्ही बाजूची लोकं जमा झाली. दोन्ही ग्रुपमध्ये बाचाबाची झाली. वाद टोकाला गेल्यानंतर हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस तिथली गर्दी पांगवली, त्यानंतर त्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटातील बाजूकडून तिथं पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिस कोणावर काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. काल रात्री अचानक झालेल्या गोंधळामुळे गावात घबराहट पसरली होती.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर