संतापजनक! 11 हजार रुपयांसाठी हॉस्पिटलने थेट मंगळसूत्रं घेतलं; बुलडाण्यातील धक्कादायक घटना

बुलडाण्याच्या खामगावात संतापजनक घटना समोर आली आहे. बिलमध्ये 11 हजार रुपये कमी पडत होते म्हणून रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Buldhana Private hospital looted patients relatives).

संतापजनक! 11 हजार रुपयांसाठी हॉस्पिटलने थेट मंगळसूत्रं घेतलं; बुलडाण्यातील धक्कादायक घटना
11 हजार रुपयांसाठी हॉस्पिटलने थेट मंगळसूत्रं घेतलं
| Updated on: May 23, 2021 | 6:31 PM

बुलडाणा : कोरोना महामारीच्या संकटात काही खासगी रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना लुबाडत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या सगळ्या घटना ताज्या असतानाच बुलडाण्याच्या खामगावात संतापजनक घटना समोर आली आहे. बिलमध्ये 11 हजार रुपये कमी पडत होते म्हणून रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोपर्यंत 11 हजार रुपये किंवा मंगळसूत्र देत नाही तोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देणार नाही, अशी तंबी देखील या रुग्णालयाने रुग्णाच्या नातेवाईकांना दिली होती. अखेर रुग्णाच्या पत्नीला गळ्यातील मंगळसूत्र काढून रुग्णालय प्रशासनाला द्यावं लागलं (Buldhana Private hospital looted patients relatives).

रुग्णाच्या मोठ्या भावाकडून उद्विग्नता व्यक्त

संबंधित घटनेवर रुग्णाच्या मोठ्या भावाने नाराजी व्यक्त केली आहे. मुलाच्या उपचारासाठी त्याच्या पत्नीने कानातील दागिने गहान ठेवले होते. खरंतर त्या दागिन्यांची किंमत 28 हजार रुपये इतकी होती. मात्र, वेळ वाईट असल्याने समोरच्याने फक्त 23 हजार दिले. रुग्णालयात मुलाला आता डिस्चार्ज मिळणार होता. रुग्णालय प्रशासनाने हिशोब केला. त्या हिशोबत आमच्याकडे 11 हजार रुपये कमी पडत होते. तर रुग्णालय प्रशासनाने ते पैशे दिल्याशिवाय रुग्णाला सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी रुग्णाच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्रच मागितलं. आमचा रुग्ण तिथे असल्याने आम्हाला नाईलाने मंगळसूत्र जमा करावं लागलं, अशा शब्दात रुग्णाच्या भावाने व्यथा मांडली (Buldhana Private hospital looted patients relatives).

हेही वाचा :

आई-बाप की हैवान? कर्जबाजारी झाले म्हणून चिमुकल्याला विकण्याची तयारी, बाळाला विकत घेणारी महिला एजंट जेरबंद

एकमेकांवर प्रेम जडलं, आयुष्यभर सोबतीचा निश्चय, कुटुंबियांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाचं टोकाचं पाऊल