एकमेकांवर प्रेम जडलं, आयुष्यभर सोबतीचा निश्चय, कुटुंबियांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाचं टोकाचं पाऊल

दौंड तालुक्यातील पाटस येथील अल्पवयीन मुलगी आणि नानविज येथील 25 वर्षीय तरुण या दोघांनी एकत्र विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे (Love birds commit suicide in Daund).

एकमेकांवर प्रेम जडलं, आयुष्यभर सोबतीचा निश्चय, कुटुंबियांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाचं टोकाचं पाऊल
एकमेकांवर प्रेम जडलं, आयुष्यभर सोबतीचा निश्चय, कुटुंबियांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाचा टोकाचं पाऊल

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील पाटस येथील अल्पवयीन मुलगी आणि नानविज येथील 25 वर्षीय तरुण या दोघांनी एकत्र विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. त्या दोघांचं एकमेकांवर जीवापड प्रेम होतं. दोघांनी लग्न देखील करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या कुटुंबियांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे दोघांनी संतापात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. दोघांनी दौंड तालुक्यातील कुसगाव येथील जंगलात विष प्राशन करुन स्वत:ला संपवलं. या घटनेमुळे आजूबाजूच्या गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रेमी युगुलाने असा टोकाचा निर्णय घेतल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे (Love birds commit suicide in Daund).

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

या प्रेमी युगुलाच्या कुटुंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. सध्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं. चांगल्या पगाराच्या नोकरीला लागावं. समाजात नाव कमवावं. किंवा निदान एक चांगली व्यक्ती व्हावी, अशी प्रत्येक आई-वडिलांची अपेक्षा असते. दौंड तालुक्यातील आत्महत्या केलेल्या या युगुलाच्या कुटुंबियांच्या देखील अशाच काही अपेक्षा असतील.

याशिवाय त्यांच्या चांगल्यासाठीच ते कदाचित लग्नाला विरोध करत असावीत. पण त्यांच्या कानावर अचानक दोघांच्या आत्महत्येची बातमी पडल्यावर त्या आई-वडिलांना केवढा मोठा धक्का बसला असेल याची कल्पनाही करता येणार नाही. या प्रेमी युगुलाला दुसरा काही पर्याय शोधता आला असता. पण त्यांनी त्याचा विचार न केल्याने दोघी कुटुंबांवर मोठं संकट ओढावलं आहे (Love birds commit suicide in Daund).

पोलिसांची प्रतिक्रिया

या घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “मी ड्युटीवर जात असताना मला कुसेगावच्या पोलीस पाटलांचा फोन आला. त्यांनी मला सुपेघाट येथे एक मुलगा आणि मुलीने विष प्राशान करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती दिली. तसेच मला तात्काळ घटनास्थळी या, असं सांगितलं. त्यानंतर मी आणि आमचे पोलीस नाईक चव्हाण तातडीने घटनास्थळी गेलो. तिथे आम्ही रुग्णवाहिकेने तातडीने रुग्णवालयात नेवून वाचवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. पण उपचारादरम्यान दौघांचा मृत्यू झाला. मुलाचं वय 25 वर्षे इतकं होतं. त्याचं नाव क्षीरसागर असं होतं. तर मुलगी फक्त 16 वर्षांची होती. त्यांनी चुकीचा निर्णय घेतला. घरातील लोकांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे”, अशी प्रतिक्रिया संजय नागरगोजे यांनी दिली.

हेही वाचा :

सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

आई-बाप की हैवान? कर्जबाजारी झाले म्हणून चिमुकल्याला विकण्याची तयारी, बाळाला विकत घेणारी महिला एजंट जेरबंद