प्रेयसीला बेदम मारहाण करणाऱ्या प्रियकराचं घरं बुलडोझरने पाडलं, पाहा अजून काय काय कारवाई केली

प्रेयसीला रस्त्यात तुडवलेल्या प्रियकराचं घर बुलडोझरने पाडलं, पाहा पोलिस काय म्हणतात...

प्रेयसीला बेदम मारहाण करणाऱ्या प्रियकराचं घरं बुलडोझरने पाडलं, पाहा अजून काय काय कारवाई केली
प्रेयसीला रस्त्यात तुडवलेल्या प्रियकराचं घर बुलडोझरने पाडलं
Image Credit source: twitter
| Updated on: Dec 26, 2022 | 3:16 PM

मध्यप्रदेश : राज्यातील एक व्हिडीओ (VIDEO) सोशल मीडियावर (Social Media)प्रचंड व्हायरल झाला आहे. प्रेयसीने लग्नाला नकार दिल्यामुळे प्रियकाराने प्रेयसीला रस्त्यात बेदम मारहाण केली, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी (Police) सांगितली आहे.

कुटुंबियांची परवानगी नसल्यामुळे प्रेयसीने प्रियकराला लग्नाला नकार दिला. त्यानंतर संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीला भररस्त्यात बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. ज्यावेळी प्रेयसीला मारहाण करण्यात आली. त्यावेळी प्रेयसी जाग्यावर कित्येक तास तशीचं पडून होती.


पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मुलींच्या आईने पोलिसांकडे कसल्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही. पण पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.


विशेष म्हणजे दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आणि जिल्हा प्रशासनाने आरोपीचं घर बुलडोझरने पाडलं आहे. त्याचा सुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आरोपी मुलगा ड्राइव्हरचं काम करतो अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.