AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसत असतील तर समजून घ्या की तुम्हाला मिळेल गुड न्यूज

स्वप्नांच्या शास्त्रानुसार स्वप्ने भविष्यातील घटनांचे संकेत असतात. काही स्वप्ने अत्यंत शुभ मानली जातात, जी जीवनात आनंद दर्शवतात. मात्र काही स्वप्ने अशुभ मानली जातात. चला अशा काही स्वप्नांबद्दल जाणून घेऊया जे शुभ मानले जातात.

स्वप्नात 'या' गोष्टी दिसत असतील तर समजून घ्या की तुम्हाला मिळेल गुड न्यूज
Dream
| Edited By: | Updated on: Mar 12, 2026 | 8:00 AM
Share

स्वप्नशास्त्रानुसार आपली स्वप्नं केवळ काल्पनिक प्रतिमा नसतात ती आपल्या भविष्यातील घटनांचे संकेत देखील देतात. झोपल्यावर सर्वांनाच स्वप्न पडत असतात. काही चांगली, काही वाईट, काही अगदी खास असतात. पण प्रत्येकाला स्वप्नात काही ना काही दिसत असतं. तसेच स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे हे भाग्याचं असतं. तर आजच्या लेखात आपण काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत जे शुभ मानले जातात आणि जीवनात काही चांगल्या होण्याचे संकेत देतात.

स्वप्नात एखाद्या परिचित महिलेला लग्नाच्या पोशाखात पाहणे किंवा लग्नाची वरात पाहणे हे खूप शुभ मानले जाते. असे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. शिवाय अशी स्वप्नं आदर आणि सन्मानात वाढ दर्शवतात. म्हणून जर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर समजून घ्या की तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे.

या स्वप्नाला घाबरू नका

स्वप्नात साप दिसल्यावर अनेकजण खूप घाबरतात, परंतु स्वप्न शास्त्रानुसार सापांशी संबंधित काही स्वप्नांचे वर्णन करते जे खूप शुभ मानले जातात. जसे की जर तुम्हाला स्वप्नात रंगीबेरंगी साप दिसले तर ते सूचित करते की लवकरच तुमच्या आयुष्यात अनेक आनंदी घटना येतील.

जर तुम्हाला साप पकडण्याचे स्वप्न पडले तर ते एक भाग्यवान स्वप्न मानले जाते. हे केवळ आर्थिक लाभ दर्शवत नाही तर तुमच्या समस्या लवकरच दूर होतील हे देखील दर्शवते.

स्वप्नात मधमाशांचं पोळं दिसणे

तुम्हाला जर स्वप्नात मधमाशांचं पोळं दिसलं तर हा खूप मोठा शुभ संकेत असू शकतो. त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच खुप पैसा मिळणार आहे.

अशी स्वप्ने शुभ असतात

हिंदू धर्मात सूर्य देवाचे विशेष स्थान आहे. भविष्य पुराणानुसार स्वप्नात सूर्य देवाचे दर्शन शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की नजीकच्या भविष्यात तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. याव्यतिरिक्त स्वप्नात पाऊस दिसणे, सोने किंवा दागिने मिळणे, मंदिरात जाणे किंवा स्वतःला उंच ठिकाणी पाहणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी