तीस्ता सेटलवाड यांच्यासह चौघांवर अहमदाबाद न्यायालयात आरोपपत्र दाखल, काय आहे प्रकरण ?

आरोपपत्रानुसार, तीस्ता सेटलवाड यांनी 2002 च्या गुजरात दंगलीत तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुंतवण्यासाठी पुरावे, बनावट कागदपत्रे तयार केली होती.

तीस्ता सेटलवाड यांच्यासह चौघांवर अहमदाबाद न्यायालयात आरोपपत्र दाखल, काय आहे प्रकरण ?
तीस्ता सेटलवाड यांच्यासह चौघांवर आरोपपत्र दाखलImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 12:29 AM

अहमदाबाद : विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी तीस्ता सेटलवाड (Teesta Setalwad), निवृत्त पोलीस महासंचालक आरबी श्रीकुमार आणि माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांच्याविरुद्ध आरोपपत्र (Charge sheet) दाखल केले. 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी पुरावे तयार केल्याप्रकरणी अहमदाबाद न्यायालयात (Ahmedabad Court) आरोपपत्र दाखल केले आहेत. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकारी आणि सहायक पोलीस आयुक्त बी.व्ही.सोळंकी यांनी सांगितले.

तीस्ता सेटलवाड यांच्यावर अनेक गंभीर आरोप

माजी आयपीएस अधिकारी वकिल राहुल शर्मा यांनाही या प्रकरणात साक्षीदार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोपपत्रात एसआयटीने तीस्ता सेटलवाड यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले असून या आरोपांना पुष्टी देण्यासाठी एसआयटीने न्यायालयात पुरावेही सादर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुंतवण्यासाठी पुरावे तयार केल्याचा आरोप

आरोपपत्रानुसार, तीस्ता सेटलवाड यांनी 2002 च्या गुजरात दंगलीत तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुंतवण्यासाठी पुरावे, बनावट कागदपत्रे तयार केली होती. या कटात दोन माजी आयपीएस अधिकारी आरबी श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांचाही सहभाग होता, असे एसआयटीने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

तीस्ता आणि संजीव एकमेकांच्या संपर्कात असल्याचा आरोप

तीस्ता आणि संजीव भट्ट एकमेकांच्या संपर्कात असल्याचा आरोप एसआयटीने केला आहे. संजीव भट्ट हे प्रमुख पत्रकार, स्वयंसेवी संस्था आणि गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांच्याशी ईमेलद्वारे संपर्कात होते.

संजीव भट्ट यांनी या सर्व आरोपींना अॅमिकस क्युरी आणि इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी भडकवले होते आणि स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 468, कलम 194 आणि कलम 218 या कलमांसह इतर तरतुदींखाली आरोप निश्चित केले आहेत.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात तीस्ता यांची जामिनावर सुटका

जूनच्या शेवटच्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या सेटलवाड यांची सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सप्टेंबरच्या आदेशानंतर अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणात श्रीकुमार आणि संजीव भट्ट हे दोघे कारागृहात आहेत.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.