VIDEO : बीडमध्ये राडा ! पोलीस स्टेशन परिसरातच दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, महिलांनाही मारहाण

| Updated on: May 09, 2021 | 9:25 PM

शेतात नाली खोदन्याच्या क्षुल्लक कारणावरुन उमरी येथे दोन गटात जीवघेणी हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे (Clash between two groups in Beed police station premises).

VIDEO : बीडमध्ये राडा ! पोलीस स्टेशन परिसरातच दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, महिलांनाही मारहाण
पोलीस ठाण्याबाहेर दोन गटात तुफान हाणामारी
Follow us on

बीड : शेतात नाली खोदन्याच्या क्षुल्लक कारणावरुन उमरी येथे दोन गटात जीवघेणी हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीत विटा, दगडफेक यांचा समावेश होता. या हाणामारीची माहिती पोलिसांना कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्तीने हे भांडण मिटवण्यात आलं. मात्र, पोलीस ठाण्यात दोन्ही गट परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यासाठी आले तेव्हा पोलीस ठाणे परिसरातच दोन्ही गटात पुन्हा तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत महिला देखील जखमी झाल्या. या हाणामारीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे (Clash between two groups in Beed police station premises).

नेमकं प्रकरण काय?

केज तालुक्यातील उमरी येथे शेतात नाली खोदान्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारातही त्यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. उमरी येथे भाऊराव चाळक आणि शेख अली अकबर यांची शेजारी जमीन आहे. शेतात नाली खोदन्याच्या कारणावरुन रविवारी (9 मे) दुपारी दोन्ही गट परस्परांशी भिडले. दोन्ही गटाकडून दगड, विटा आणि लाठ्याकाठ्यांचा वापर करुन हाणामारी झाली.

पोलिसांच्या हस्तक्षेपाने शेतातील हाणामारी निवाळली

या हाणामारीत एकाच्या उजव्या हाताची करंगळी तुटली तर एकाचे दात पडले. तर अन्य एकाचा हात फ्रॅक्चर झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उमरी येथे पोलीस पथक पोहोचले आणि त्यांनी हस्तक्षेप करून भांडण सोडविले (Clash between two groups in Beed police station premises).

पोलीस ठाण्याबाहेर पुन्हा हाणामारी

या घटनेनंतर दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यासाठी केज पोलीस ठाण्यात गेले. यावेळी दोन्ही गट पोलीस ठाणे परिसरात समोरासमोर येताच पुन्हा त्यांच्यात तुंबळ फ्री स्टाईल हाणामारी आणि दगडफेक झाली. त्यांच्यापैकी एकाच्या बोलेरो गाडीवरही दगडफेक करण्यात आली.

हाणामारीत 12 ते 13 जण जखमी

दोन्ही गटातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास 12 ते 13 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहीती आहे. या भांडणातील दगडफेकीमुळे दोन बोलेरो गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हाणामारीचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : रश्मी शुक्लांच्या चौकशीसाठी मुंबई सायबर पोलिसांची टीम हैदराबादच्या घरी धडकणार?