VIDEO | रोडवर युवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

VIDEO | युवकांमध्ये रोडवर हाणामारी, कोण कुणाला मारतंय हेचं कळेना, पाहा व्हिडीओ

VIDEO |  रोडवर युवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
crime news
Image Credit source: Google
| Updated on: Mar 24, 2023 | 12:39 PM

परभणी : परभणी (parbhani) जिल्ह्यातील दर्गा रोड (darga road) परिसरात एक घटना सीसीटिव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. त्यामध्ये काही युवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरु आहे. त्यावेळी कोण कुणाला मारतंय आणि कशासाठी मारतंय हे काहीचं कळत नाही. त्याचबरोबर इतर लोक फक्त भांडणाच्या आजूबाजून फिरत असल्याचे पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात गुंडागर्दीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. परिसरातील पारवा रोड येथे काही युवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारीची घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. सुंदर कॉम्प्लेक्स येथे काही युवकांमधील हा राडा आहे. पोलिसांकडून मात्र अद्याप कसल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून दर्गा रोड परिसरात पोलीस चौकी उभारावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून संपुर्ण जिल्ह्यात या घटनेची चर्चा आहे. त्याचबरोबर तिथं अधिकवेळा मारामारी होत असल्यामुळे स्थानिकांनी तिथं पोलिस चौकी व्हावी अशी मागणी केली आहे.