प्रॉपर्टीच्या मोहात माणुसकी, नातं सगळंच विसरला.., भावासह मिळून मुलाने जन्मदात्या पित्यालाच संपवलं..

पैसा.. प्रत्येकालाच हवा असतो, पण काहींना त्याचा मोह असतो. पण काहीवेळा पैशांचा हा मोह माणसाला इतक्या खालच्या थराला नेतो की तो पैसा मिळवण्याच्या नादात माणूस चांगल्या-वाईटाचा विचारच सोडून देतो. आपण काय करतोय याची शुद्धच त्याला रहात नाही आणि तो अशी एखादी भयानक कृती करून बसतो, ज्यामुळे त्याच्यासोबत इतरांचं आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं. प्रॉपर्टीच्या मोहात एका मुलाने स्वत:च्या डोक्यावरचं पित्याचं छत्र, स्वत:च हिरावून घेतलं.

प्रॉपर्टीच्या मोहात माणुसकी, नातं सगळंच विसरला.., भावासह मिळून मुलाने जन्मदात्या पित्यालाच संपवलं..
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 8:41 AM

मुंबई | 14 मार्च 2024 : पैसा.. प्रत्येकालाच हवा असतो, पण काहींना त्याचा मोह असतो. पण काहीवेळा पैशांचा हा मोह माणसाला इतक्या खालच्या थराला नेतो की तो पैसा मिळवण्याच्या नादात माणूस चांगल्या-वाईटाचा विचारच सोडून देतो. आपण काय करतोय याची शुद्धच त्याला रहात नाही आणि तो अशी एखादी भयानक कृती करून बसतो, ज्यामुळे त्याच्यासोबत इतरांचं आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली. जेथे प्रॉपर्टीच्या मोहात एका मुलाने स्वत:च्या डोक्यावरचं पित्याचं छत्र, स्वत:च हिरावून घेतलं. त्या इसमाने, त्याच्या भावासह मिळून स्वत:च्याच, जन्मदात्या पित्याचीच हत्या केली. याप्रकरमी पोलिसांनी रामदास कृष्णा डोंगरकर (वय 35)आणि विलास चिंटू डोंगरकर (वय 50)या दोन आरोपींना अटक केली आहे. कृष्णा राम डोंगरकर असे मृत इसमाचे नाव आहे.

कासा पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमटा घाटाळपाडा येथील जंगलात 9 मार्च रोजी कृष्णा राम डोंगरकर यांचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर या संदर्भात तपास सुरू करण्यात आला. तेव्हा त्यांन समजलं की गेल्या काही दिवसांपासून, मृत कृष्णा डोंगरकर आणि त्यांच्या भावामध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता. कृष्णा यांनाही त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा होता. त्याच मुद्यावरून त्यांच्यात बरीच भांडणं सुरू होती.

त्यानंतर कृष्णा यांचा पुतण्या विलास चिंटू डोंगरकर आणि त्यांचा स्वत:चाच मुलगा रामदास कृष्णा डोंगरकर या दोघांनी मिळून कट रचला. मृत कृष्णा डोंगरकर हे घरात झोपलेले असतानाच विलास आणि रामदास या दोघांनी मिळून कृष्णा यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह जवळच्याच जंगलात फेकून दिला, असे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक केली असून हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.