सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आज माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना महत्त्वाचं वक्तव्य केलं.

सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 6:03 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणती घडामोड घडेल? याचा भरोसा नाही. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडताना दिसत आहे. महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. या घडामोडींमुळे माढा लोकसभा मतदारसंघ सातत्याने चर्चेत येतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज माढ्यात सभा पार पडली. यावेळी त्यांनी माढ्यातील राजकीय घडामोडींबाबत अतिशय सूचक असं वक्तव्य केलं. त्यामुळे माढ्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडणं बाकी आहेत, असे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूंकप येण्याची शक्यता आहे. कारण माढ्यात निंबाळकर घराणं येत्या काळात एकत्र दिसणार का? असा प्रश्न विचारला असता फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं. “मोदी है तो मुमकिन है. आमचा प्रयत्न सर्वांना एकत्रित करण्याचा असतो, विभाजन करण्याचा नसतो. आता काय-काय होतं हे पुढे पाहा”, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस यांची आज अकलूज येथे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. अकलूजचे मोहिते पाटील हे भाजपमधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात गेले आहेत. तसेच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवारही आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांचं चांगलं वर्चस्व असलेल्या अकलूजमध्ये आज देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडत आहे. “मला वाटतं आज अकलूजला कोणाचेही प्रवेश नाहीत. आमची आज सभा आहे. ज्याप्रमाणे माढ्याला सभा आहे, ज्याप्रमाणे सांगोल्याला सभा आहे, त्याचप्रमाणे अकलूजला सभा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असा वेगळा काही विचार करण्याचा आणि आम्ही तिथे सभा घेतोय हे आश्चर्य आहे, असं काही नाहीय”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘शरद पवारांनी मोहिते पाटलांचं राजकारण संपवलं तेव्हा…’

“प्रत्येक टीकेला आम्ही कृतीतून उत्तर देतो. शेवटी लोकांना दिसतंय ना, ज्यावेळी शरद पवारांनी मोहिते पाटलांचं राजकारण जवळपास संपुष्टात आणलं होतं त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहिलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की, त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलंय, अशी परिस्थिती नाही. पण मी त्यावर जास्त काही बोलणार नाही. त्यांच्या पाठिशी आम्ही उभे राहिलो, आता त्यांना काय करायचं आहे, हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘महायुतीला प्रचंड मतदान मिळालं’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा जिंकून येतील. विरोधी पक्षांकडून आताही वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरी मांडल्या जात आहेत. त्या थिअरी त्यांच्याकरता गरजेच्या आहेत. कारण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत नाही. त्यांच्या कॅडरमध्ये उत्साह दिसत नाही. त्यामुळे आपण कुठेतरी जिंकतोय, अशा अफवा सोडल्या तर कदाचित आपला कार्यकर्ता कामी लागेल, असं त्यांना वाटतं. मतदानाचे दोन टप्पे झाले आहेत. मोदींनी काल सांगितलं की, दोन टप्प्यांमध्ये आम्ही जिंकतोय. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे. दोन्ही टप्प्यांमध्ये महायुतीला प्रचंड मतदान मिळालं आहे आणि आमचा चांगला विजय होणार आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज ठाकरेंची सभा कुठे-कुठे होणार हे आम्ही नक्कीच घोषित करु, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

Non Stop LIVE Update
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर
अमित शाह-मोदी, शिंदेंवर राऊतांचे प्रश्न अन उद्धव ठाकरेंची रोखठोक उत्तर.
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?
मी औरंगजेबाचा फॅन..., विरोधकांच्या 'त्या' टीकेवर ठाकरेंचा पलटवार काय?.
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.