AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदानाला अवघे काही तास बाकी असताना पुण्यात रात्रीच्या वेळी राजकारण तापलं, रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

पुण्यात लोकसभेचं चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होण्यास अवघे काही तास उरलेलं असताना राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत सहकारनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे.

मतदानाला अवघे काही तास बाकी असताना पुण्यात रात्रीच्या वेळी राजकारण तापलं, रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
मतदानाला अवघे काही तास बाकी असताना पुण्यात रात्रीच्या वेळी राजकारण तापलं
| Updated on: May 12, 2024 | 10:40 PM
Share

पुणे लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. पण मतदानाला काही तास शिल्लक असताना पुण्यात घडामोडींना वेग आलाय. पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर पैशांचा वाटपाचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांकडे केली आहे. यासाठी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात सहकारनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. धंगेकर आपल्या मागणीवर ठाम आहेत. पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे.

“गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहराच्या झोपडपट्ट्या, वस्त्यांमध्ये भाजपचे आजी-माजी नगरसेवक, पालकमंत्री, आमदार पैसे वाटप करत आहेत. आमची माणसं तक्रार करतात तर त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मी कलेक्टरला फोन लावला. आम्ही पुणे शहरातून पैशांची ही पाकिटं गोळा केली आहेत. पुणे शहरात भाजपवाले नागरिकांच्या दारासमोर हजारो आणि लाखो रुपये नेत आहेत. आमच्या जनतेचे चोरलेले पैसे अशाप्रकारे वाटप केले जात आहेत. हे पैसे काही नागरिकांना देण्यात आले होते. काही नागरिकांनी हे पैसे आमच्या हातात दिले. जोपर्यंत पैसे वाटप करण्याचं थांबत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही”, अशी भूमिका रवींद्र धगेकर यांनी मांडली आहे.

भाजपचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांच्या भेटीला

रवींद्र धंगेकर यांच्या या आरोपांनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी धंगेकर यांची तक्रार केली. यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “समोरचे भाजपचे कार्यकर्ते जे काम करत आहेत त्यांना डिस्टर्ब करायचं, त्यांना अडकवायचं ही रवींद्र धंगेकर यांची स्ट्रॅटेजी आहे. हे आम्ही मागच्यावेळेसही बघितलं आहे. आम्ही पोलीस आयुक्तांकडे उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदानाच्या दिवशी रवींद्र धंगेकर यांचा ड्रामा हॅण्डल करावा हे सांगण्यासाठी इथे आलो आहोत. पोलीस त्यांचं काम करतील”, अशी प्रतिक्रिया भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्याबाहेर प्रचंड मोठी गर्दी केली. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे “रवींद्र धंगेकर यांच्याकडून ड्रामा सुरु आहे. आमचा उमेदवार जिंकणार आहे त्यामुळे त्यांना असुरक्षित वाटू लागलं आहे. त्यांच्याकडे पुरावा असता तर त्यांनी थेट नावे घेतली असती”, असं प्रत्युत्तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रवींद्र धंगेकर यांना दिलं.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.