AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, तरुणावर लग्नासाठी दबाव, युवती ब्लॅकमेल करत महाराष्ट्रातून राजस्थानला

आरोपी तरुणीने तक्रारदार युवकावर लग्न करण्यासाठी दबाव आणला. लग्न न केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही तिने दिली. तसेच ती वारंवार आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याचाही आरोप आहे

इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, तरुणावर लग्नासाठी दबाव, युवती ब्लॅकमेल करत महाराष्ट्रातून राजस्थानला
तरुणीचा युवकाला लग्नासाठी दबाव
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 04, 2021 | 7:40 AM
Share

जयपूर : इन्स्टाग्रामवर झालेली मैत्री आणि पैशांचा व्यवहार मुंबईत नोकरी करणाऱ्या मूळ राजस्थानच्या युवकाला चांगलाच महागात पडला. तरुणीने लग्नासाठी दबाव आणत तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातील तरुणीने थेट तरुणाचं राजस्थानातील गाव गाठत त्याला आत्महत्येची धमकीही  दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे तक्रारदार तरुणाच्या भावानेही तिला साथ दिल्याचा दावा केला जात आहे. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Instagram Friend blackmails man for wedding demands money after blackmail)

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील जसवंतपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत पंचौरी गावातील हे प्रकरण आहे. भीमाराम सुतार नावाच्या तरुणाची अनिताच्या नावाच्या तरुणीशी तीन-चार वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. आधी चॅटिंग, नंतर फोनवर गप्पा, या निमित्ताने दोघांमध्ये जवळीक वाढली.

तक्रारदाराच्या भावासोबत तरुणी दुकानात

भीमाराम मुंबईतील एका मोबाईल दुकानात काम करत होता. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचा मामेभाऊ छगनारामसोबत आरोपी तरुणी अनिता एक दिवस त्याच्या मोबाईल दुकानात आली. अनिताला काही पैसे दे, असं छगानारामने भीमारामला सांगितलं. भावाच्या सांगण्यावरुन त्याने अनिताला काही पैसेही दिले. अनिता नर्सची नोकरी करत असल्याची माहिती आहे.

पैशांच्या व्यवहारानंतर ब्लॅकमेलिंग

काही दिवसांनी अनिताने भीमारामला सगळे पैसे परत दिले. त्यामुळे भीमारामचा तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर पुन्हा तिने काही पैशांची मागणी केली. तेव्हा भीमारामने तिला 25 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्यापैकी केवळ आठच हजार रुपये तिने परत केल्याचा दावा केला जातो.

दरम्यानच्या काळात छगनाराम आणि अनिताने भीमारामला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अनिताने त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणला. लग्न न केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही तिने दिली. त्याचवेळी लॉकडाऊन लागल्याने भीमाराम गावी परतला.

तरुणीची आत्महत्येची धमकी

हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही. छगनाराम अनितासोबत भीमारामच्या गावी पोहोचला. भीमारामच्या नातेवाईकांकडे अनिताने पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर अनिता वारंवार आत्महत्या करण्याच्या धमक्या देऊ लागली. भीमारामने अखेर पोलिसात धाव घेऊन दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अनिता आणि छगनारामविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील नामांकित कॉलेजचा ऑनलाईन वर्ग, टवाळखोरांनी पॉर्न व्हिडीओ सुरु केला आणि…

CCTV दुरुस्तीच्या निमित्ताने मोबाईलवर अ‍ॅक्सेस, दाम्पत्याच्या बेडरुममधले व्हिडीओ तंत्रज्ञाकडून रेकॉर्ड

(Instagram Friend blackmails man for wedding demands money after blackmail)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ