मुंबईतील नामांकित कॉलेजचा ऑनलाईन वर्ग, टवाळखोरांनी पॉर्न व्हिडीओ सुरु केला आणि…

विलेपार्ले येथील संबंधित महाविद्यालयाचा ऑनलाईन वर्ग सुरु झाला, तेव्हा काही अज्ञात आरोपींनी अश्लील व्हिडीओ अपलोड केले. वर्ग सुरु असतानाच पॉर्न व्हिडीओ सुरु झाल्यामुळे एकच खळबळ उडाली

मुंबईतील नामांकित कॉलेजचा ऑनलाईन वर्ग, टवाळखोरांनी पॉर्न व्हिडीओ सुरु केला आणि...
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : मुंबईतील महाविद्यालयाचा ऑनलाईन वर्ग सुरु असताना अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदवून जुहू पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. विलेपार्ले भागातील संबंधित कॉलेजचा ऑनलाईन क्लास सुरु असताना टवाळखोरांनी पॉर्न व्हिडीओ सुरु केल्याचा आरोप आहे. (Mumbai Cyber Crime Miscreants played obscene video during online class of Vile Parle college)

ऑनलाईन शिक्षणातही अडी-अडचणी

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालयं अद्यापही बंद आहेत, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. संसर्गाच्या भीतीमुळे शाळा किंवा महाविद्यालयात जाणे शक्य नाही, म्हणून विद्यार्थी आपापल्या घरातून ऑनलाईन वर्गात सहभागी होत आहेत. शिक्षक-प्राध्यापकही आपल्या परीने कुठलीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घेत आहेत. मात्र अशात काही टवाळखोर या शिक्षणातही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळाल्या माहितीप्रमाणे जेव्हा विलेपार्ले येथील संबंधित महाविद्यालयाचा ऑनलाईन वर्ग जेव्हा सुरु झाला, तेव्हा काही अज्ञात आरोपींनी अश्लील व्हिडीओ अपलोड केले. वर्ग सुरु असतानाच पॉर्न व्हिडीओ सुरु झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात गुन्हा नोंदवून जुहू पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

प्रोफेसरच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा

जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, हे प्रकरण चार दिवसांपूर्वीचे आहे. महाविद्यालयीन प्राध्यापकाने याबाबत तक्रार केली होती, त्या आधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम 292, 570 आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलिसांबरोबरच मुंबई सायबर सेलचे अधिकारीही संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊन दरम्यान भारतात चाईल्ड पॉर्नच्या प्रमाणात वाढ, सायबर विभाग कठोर कारवाई करणार

CCTV दुरुस्तीच्या निमित्ताने मोबाईलवर अ‍ॅक्सेस, दाम्पत्याच्या बेडरुममधले व्हिडीओ तंत्रज्ञाकडून रेकॉर्ड

(Mumbai Cyber Crime Miscreants played obscene video during online class of Vile Parle college)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI