CCTV दुरुस्तीच्या निमित्ताने मोबाईलवर अ‍ॅक्सेस, दाम्पत्याच्या बेडरुममधले व्हिडीओ तंत्रज्ञाकडून रेकॉर्ड

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 27, 2021 | 11:24 AM

टेक्निशियन म्हणून काम करणारा आरोपी राशिद सीसीटीव्ही रिपेअर करण्याच्या निमित्ताने दाम्पत्याच्या घरी गेला होता. यावेळी त्याने दाम्पत्याच्या नकळत सीसीटीव्हीचा अ‍ॅक्सेस आपल्या मोबाईलवर घेतला.

CCTV दुरुस्तीच्या निमित्ताने मोबाईलवर अ‍ॅक्सेस, दाम्पत्याच्या बेडरुममधले व्हिडीओ तंत्रज्ञाकडून रेकॉर्ड
CCTV Camera

Follow us on

नवी दिल्ली : घरात सीसीटीव्ही दुरुस्त करण्याच्या निमित्ताने जाऊन त्याचा अ‍ॅक्सेस मोबाईलवर घेणाऱ्या विकृताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तक्रारदार दाम्पत्याच्या बेडरुममधील सीसीटीव्ही कॅमेराचा अ‍ॅक्सेस आपल्या मोबाईलवर घेऊन आरोपी त्यांचे खासगी क्षण पाहत होता. प्रायव्हेट व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करुन खंडणीसाठी त्याने दाम्पत्याला ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे. (Delhi CCTV Technician records private video of couple in bedroom taking access on mobile)

CCTV बिघडल्याची दाम्पत्याची तक्रार

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरुतून राशिद नावाच्या आरोपीला अटक केली आहे. दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या तक्रारदार दाम्पत्याच्या घरातील सीसीटीव्ही काही महिन्यांपूर्वी बिघडला होता. त्यामुळे त्यांनी संबंधित कंपनीकडे कॅमेरा दुरुस्त करण्यासंबंधी तक्रार केली. यावेळी कंपनीने तंत्रज्ञाला घरी पाठवण्याची हमी दिली.

दाम्पत्याच्या बेडरुममधील व्हिडीओ रेकॉर्ड

संबंधित कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करणारा आरोपी राशिद सीसीटीव्ही रिपेअर करण्याच्या निमित्ताने दाम्पत्याच्या घरी गेला होता. यावेळी त्याने दाम्पत्याच्या नकळत सीसीटीव्हीचा अ‍ॅक्सेस आपल्या मोबाईलवर घेतला. काही महिन्यांनी दाम्पत्याच्या मोबाईलवर त्यांच्याच बेडरुममध्ये शूट झालेली त्यांची खासगी व्हिडीओ क्लीप आली. तीन लाख रुपयांची खंडणी न दिल्यास हा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी आरोपीने त्यांना दिली.

दाम्पत्याने पोलिसात तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरुतून राशिदला अटक केली. राशिद मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. दिल्लीत काम करताना त्याने हे प्रकार केले होते. लॉकडाऊनच्या काळात आधीची नोकरी सोडून तो बंगळुरुला गेला.

आरोपीच्या फोनमध्ये आणखीही व्हिडीओ

पीडित पती-पत्नी नोकरी करतात. त्यांची मुलगी घरी एकटी असते. तिची काळजी घेण्यासाठी एका महिलेला कामावर ठेवले आहे. यासाठी दाम्पत्याने घरात जागोजागी सीसीटीव्ही बसवले होते. परंतु आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला. राशिदचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्यात अनेक व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याने हे प्रकार कुठे आणि कधीपासून केले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

संबंधित बातम्या :

हॉटेल पार्सल ते मसाजर घरी पाठवून छळ, वसईतील तरुणीला ऑनलाईन मित्राकडून त्रास

शंभरहून अधिक महिलांना आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवले, 22 वर्षीय जिम ट्रेनरला अटक

(Delhi CCTV Technician records private video of couple in bedroom taking access on mobile)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI