हॉटेल पार्सल ते मसाजर घरी पाठवून छळ, वसईतील तरुणीला ऑनलाईन मित्राकडून त्रास

तरुणीच्या परिसरात राहणाऱ्या व्यक्तींशी मैत्री करुन आरोपी तरुणीची बदनामी करत होता. त्याने तिच्या पत्त्यावर हॉटेल, एसी-टीव्ही रिपेअर करणाऱ्या व्यक्ती यांना पाठवून तिला त्रास देण्याचे प्रकार सुरु केले.

हॉटेल पार्सल ते मसाजर घरी पाठवून छळ, वसईतील तरुणीला ऑनलाईन मित्राकडून त्रास
प्रातिनिधिक फोटो

वसई : वसईतील तरुणीला दिल्लीतील तरुणाशी ऑनलाईन मैत्री करणं चांगलंच महागात पडलं आहे. मैत्री तोडल्यानंतरही आरोपी तिच्या घरच्या पत्त्यावर हॉटेल पार्सल, टीव्ही रिपेअर, मसाज करणाऱ्या व्यक्तींना पाठवून त्रास देत होता. अखेर वसई पोलिसांनी त्याला दिल्लीतून अटक केली. (Cyber Crime Online Friend from Delhi harasses Vasai Girl)

मैत्री तुटल्यानंतर बदनामी

सोशल मीडियावर झालेली मैत्री वसईत राहणाऱ्या तरुणीला चांगलीच त्रासदायक ठरली. दिल्लीत राहणाऱ्या तरुणासोबत तिची ऑनलाईन मैत्री झाली. मात्र दोघांमध्ये वितुष्ट आले आणि त्यांचे मैत्रीसंबंध तुटले. मैत्री तोडल्यानंतर तरुणाने सोशल मीडियातून तिची बदनामी करण्यास सुरुवात केली.

घरच्या पत्त्यावर हॉटेलची पार्सल

तरुणीच्या परिसरात राहणाऱ्या व्यक्तींशी मैत्री करुन आरोपी तरुणीची बदनामी करत होता. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तिचा पत्ता मिळवला. तिच्या पत्त्यावर हॉटेल, एसी-टीव्ही रिपेअर करणाऱ्या व्यक्ती, मसाज करणाऱ्या व्यक्ती यांना पाठवून तिला त्रास देण्याचे प्रकार सुरु केले.

आरोपी तरुणाला दिल्लीतून अटक

या प्रकाराला वैतागलेल्या तरुणीने अखेर पोलिसात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरुन अखेर वसईच्या माणिकपूर पोलिसांनी तरुणाला दिल्लीतून अटक केली आहे. त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी वसई न्यायालयाने सुनावली आहे.

नागपुरात पत्नीची बदनामी

दुसरीकडे, नागपुरात राहणाऱ्या विवाहितेने पतीच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून आपल्या माहेरी जाण्याची गोष्ट केली होती. परंतु, पतीने नकार दिला. काही दिवसांनी जेव्हा पती कामानिमित्त नागपूरला गेला, तेव्हा पत्नीने पळ काढून माहेर गाठलं. पण पत्नी माहेरी गेल्याची बाब आरोपी पतीला खटकली आणि त्याने पत्नीची बदनामी करत तिचा अश्लील व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला होता. त्यानंतर पतीला बेड्या ठोकण्याक आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

पत्नीशी पटेना, नवऱ्याने फेसबुकवर तिचाच अश्लील व्हिडीओ टाकला

परदेशी तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुंबईत अभिनेत्याला अटक

(Cyber Crime Online Friend from Delhi harasses Vasai Girl)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI