आधी विष पाजलं, अन् पुढे .. दोन चिमुकल्यांसोबत पित्याने असं का केलं ?

राजधानी दिल्लीतून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. तेथे एका पित्याने त्याच्या पोटच्याच गोळ्यांची, दोन चिमुकल्या मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पित्याच्या निर्दयतेमुळे केशवपुरम भागात दहशतीचे वातावरण आहे.

आधी विष पाजलं, अन् पुढे .. दोन चिमुकल्यांसोबत पित्याने असं का केलं ?
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 12:26 PM

राजधानी दिल्लीतून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. तेथे एका पित्याने त्याच्या पोटच्याच गोळ्यांची, दोन चिमुकल्या मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पित्याच्या निर्दयतेमुळे केशवपुरम भागात दहशतीचे वातावरण आहे. थंड डोक्याने या पित्याने मुलांचा जीव घेतलाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासास सुरूवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्हीमधील फुटेजमधून मिळेल ती माहिती आणि आरोपी पित्याच्या मोबाईल सर्व्हिलन्सद्वारे त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुलांचा जीव घेणाऱ्या मारेकरी पित्याल लवकरच अटक करण्यात येईल आणि या हत्येमागचे कारण शोधण्यात येईल असे पोलिसांनी सांगितलं.

किराण दुकानात सापडले निरागस मुलांचे मृतदेह

आरोपी पित्याचे एक किराणा दुकान होते. त्याच दुकानाच्या आतमध्ये 13 वर्षाची मुलगी आणि 11 वर्षांच्या तिच्या भावाचा मृतदेह सापडला, असे पोलिसांनी सांगितले. मारेकरी पित्याने आधी मुलांना विष दिलं आणि नंतर गळा दाबून त्यांची हत्या केली, असा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी पिता तेथून लागलीच फरार झाला, असे समजते. वडिलांनीच चिमुकल्या मुलांची हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्याच दोन निष्पाप मुलांचा जीव घेण्याइतका एखादा बाप इतका क्रूर कसा असू शकतो असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात सध्या आहे.

अटकेसाठी पोलिसांची टीम तैनात

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी टीम तयार केली आहे. पोलीस प्रत्येक कानाकोपऱ्यावर लक्ष ठेवून आहेत. त्याच्या सर्व नातेवाईकांचीही कसून चौकशी केली जात आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.