सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीची खर्च कसा भागतो? अभिनेत्रीने ‘सिंगल मदर’ म्हणून केलाय 2 मुलांचा सांभाळ
Saif Ali Khan Ex wife : सिनेमात काम मिळत नाही... कोणात्या शोमध्ये देखील झळकत नाही... तरी देखील कसा भागतो सैफ अली खान याच्या पहिल्या पत्नीच्या घराचा खर्च..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री अमृता सिंग हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

अभिनेता सैफ अली खान याची पहिली पत्नी आणि अभिनेत्री अमृता हिने अभिनय, सौंदर्याच्याय जोरावर चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये अमृता हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून अमृता लाईमलाईटपासून दूर आहे. तरी देखील अभिनेत्री रॉयल आयुष्य जगत आहे. सिनेमात काम मिळत नाही… कोणात्या शोमध्ये देखील झळकत नाही… तरी देखील अमृताच्या घरचा खर्च कसा भागतो… याची चर्चा कायम रंगलेली असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ याच्या पहिल्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, अमृता हिने ‘बेताब’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा बॉक्ट ऑफिसवर हीट ठरला आणि एका रात्रीत अमृता यशाच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अमृता हिला प्रोफेशनल आयुष्याच यश मिळालं. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीने अनेक अडचणींचा सामना केला.
सैफ अली खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीने फार कमी सिनेमांमध्ये काम केलं. तरी देखील अभिनेत्री आज रॉयल आयुष्य जगत आहे. अमृताच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीची आई रुक्साना सुल्तान होती. त्यानंतर पंजाबी शिविंदर सिंग यांच्यासोबत लग्न केला. रुक्साना आणि शिविंदर यांनी तीन मुलं आहेत. एक मुलगा आणि दोन मुली…
रिपोर्ट्सनुसार, अमृता सिंगची आई अतिशय श्रीमंत कुटुंबातील होती. अमृताची आई रुक्साना याही राजकारणात होत्या. संजय गांधींच्या काळात त्या चर्चेत होत्या. अमृताने तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानशी 1981 मध्ये करिअर शिखरावर असताना लग्न केले. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही . अखेर 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर सैफने अमृता सिंगला पोटगी म्हणून 5 कोटी रुपये दिले होते.
सैफ याने पहिल्या पत्नीला फक्त 5 कोटी रुपये नाहीतर, एक बंगला देखील दिला. घटस्फोटानंतर अमृता मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम याच्यासोबत बंगल्यात राहते. अमृता आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अमृतीची लेक सारा आता बॉलिवूडवर राज्य करत आहे.
साराच्या नंतर मुलगा इब्राहिम देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. इब्राहिम अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीही करतो. अशा परिस्थितीत सारा आणि इब्राहिम घराचा खर्च उचलत आहेत. अमृताने सारासाठी मुंबईत करोडोंचे ऑफिस खरेदी केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता सिंगची एकूण संपत्ती 15 मिलियन डॉलर आहे.
