AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोखंडी बैलगाडीला बांधलं, जाळ लावून… 14 वर्षाच्या पोरासोबत भयंकर कृत्य, महाराष्ट्र हादरला!

सध्या एक गंभीर घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलावर अन्वनित अत्याचार केला आहे.

लोखंडी बैलगाडीला बांधलं, जाळ लावून... 14 वर्षाच्या पोरासोबत भयंकर कृत्य, महाराष्ट्र हादरला!
dhule crime newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2025 | 8:02 PM
Share

Dhule Crime News : ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याचा संशय घेऊन एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अन्वनित अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलाचे अपहरण करून त्याला लोखंडी बैलगाडीला बांधून खालून जाळ लावत चटके देण्यात आले आहेत. या घटनेनंतर आता चटक्यांनी गंभीररित्या भाजलेल्या मुलावर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जळोद रस्त्यालगतच्या भामपूर शेतीच्या शिवारात ही घटना घडली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं?

शिरपूर तालुक्यातील जळोद रस्त्यालगतच्या भामपूर शेती शिवारात एक वीटभट्टी आहे. याच विटभट्टीजवळ हा प्रकार घडला आहे. येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अगोदर अपहरण करणय्यात आले. सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हा मुलगा अचानक गायब झाला. त्याच्या कुटंबीयांनी बरीच शोधाशोध केली. परंतु समोर आलेल्या माहितीने सर्वांना मोठा धक्का बसला. पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भामपूर येथील चिंतामण उर्फ चिंतू साहेबराव कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी यांनी मुलाला जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याचे अपहरण केले. यानंतर त्याला शिरपूर-जळोद रस्त्यावरून शेतातील वीटभट्टी परिसरात नेण्यात आले. तेथे त्याला मारहाण करून एका लोखंडी बैलगाडीला बांधण्यात आले. या क्रूरतेनंतर दोन्ही संशयितांनी बैलगाडीच्या खाली जाळ केला. गाडीखाली लावण्यात आलेल्या आगीमुळे लोखंडी पत्रा तापला आणि हिमांशू गंभीररित्या भाजला. त्याने ट्रॅक्टरचे लाईट माझ्याकडे आहेत. मी आणून देतो, असे सांगत गयावया केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी त्या मुलाला सोडून दिले.

पोलिसांनी केले गंभीर गुन्हे दाखल

घरी परतल्यावर आई-वडिलांना त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर गावात खळबळ उडाली. जखमी अवस्थेतील हिमांशूला शिरपूर कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिरपूर शहर पोलिसांनी चिंतामण उर्फ चिंटू भाऊसाहेब कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर साहेबराव कोळी या दोघांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि हिमांशू याचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांसह बालसंरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Follow Us
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?