AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन मर्डर करेन, हिंमत असेल तर पकडून दाखवा, हकालपट्टी होताच शिपायाची पोलिसांना धमकी

येणाऱ्या दिवसात 3 खून करेन आणि जर पोलिसांमध्ये हिम्मत असेल तर त्याला पकडून दाखवावं, असं आव्हान हकालपट्टी करण्यात आलेला शिपाई दिग्विजय रायने पोलिसांना दिलं.

तीन मर्डर करेन, हिंमत असेल तर पकडून दाखवा, हकालपट्टी होताच शिपायाची पोलिसांना धमकी
| Updated on: Feb 15, 2021 | 3:41 PM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बस्तीमध्ये एक हकालपट्टी केलेल्या शिपायाने युपी पोलिसांना (Dismissed Constable Gave Challenge To UP Police) फिल्मी स्टाईलने आव्हान दिलं आहे. येणाऱ्या दिवसात 3 खून करेन आणि जर पोलिसांमध्ये हिम्मत असेल तर त्याला पकडून दाखवावं, असं आव्हान हकालपट्टी करण्यात आलेला शिपाई दिग्विजय रायने पोलिसांना दिलं. त्याने धमकीत म्हटलं की, तो तीन दिवसांमध्ये तीन खून करेल. गोरखपूर प्रशासन किंवा यूपी पोलीस त्याला थांबवून दाखवावं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (Dismissed Constable Gave Challenge To UP Police).

हकालपट्टी शिपाही दिग्विजय रायने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने युपी पोलिसांना धमकवताना दिवत आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणाला – मी गोरखपूर पोलिसांना, गोरखपूर एसपी आणि उत्तर प्रदेश पोलिसांना आव्हान देतो की व्हॅलेंनटाईन डेच्या दिवशी दहा वाजता मोहद्दीपूर चौकाच्या जवळपास एका व्यक्तीचा खून करणार आहे. जर, गोरखपूर पोलिसांनी किंवा युपी पोलिसांनी मला रोखून दाखवावं. या व्हिडीओमध्ये तो आणखी तीन खून करण्याची धमकी देत आहेत. दिग्विजयने बस्ती एसपी हेमराज मीणा आणि गोरखपूर आणि खलिलाबादचे एसपी यांनाही आव्हान दिलं आहे.

हकालपट्टी करण्यात आलेल्या शिपायावर गुन्हा

सोशल मीडियावर शिपाई दिग्विजय रायचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोरखपूरच्या कँट पोलिसांनी त्याच्याविरोधात धमकावणे आणि आयटी अॅक्‍टअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेणं सुरु आहे. सायबर सेल आणि सर्व्हिलान्स टीम शिपायाबाबत सर्व माहिती मिळवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस्‍ती पोलिसांनीही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ हा व्यक्ती म्हणाला, हा बस्ती जिल्ह्याच्या कप्तानगंजचा शिपाई होता आणि कुशीनगर जिल्ह्यातील तरयासुजान ठाण्याच्या बसडिला गुनागर गांवातील राहणारा आहे. याच्या वडिलांचं नाव जितेन्द्र राय आहे (Dismissed Constable Gave Challenge To UP Police).

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा कुशीनगर येथील राहणारा शिपाई दिग्विजय रायने पहिलेही पोलीस लाईनमध्ये हंगामा केला आहे. तो बस्तीच्या कप्तानगंज ठाण्यात तैनात होता. गेल्या वर्षी त्याच्यावर पोलीस लाईनमध्ये अमर्यादित व्‍यवहार करण्याचा आरोप होता आणि एसपी हेमराज मीणाने त्याला काढून टाकलं. तेव्हा त्याने एसपीला जीवानिशी मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर कप्‍तानगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. मात्र, नंतर त्याला सोडण्यात आलं.

Dismissed Constable Gave Challenge To UP Police

संबंधित बातम्या :

सरपंचपदाच्या उमेदवाराला गाडीत बसवून लॉजवर नेले, धुळ्यात सिनेस्टाईल अपहरण

दुसरं लग्न का केलं? भावा-भावातील वाद टोकाला, हत्याकांडाने अमरावती थरारलं

पालघर मॉब लिंचिंगची पुनरावृत्ती होता-होता टळली, नालासोपाऱ्यात चोर समजून तीन महिलांना चोप

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.