सांगलीत हवेत गोळीबार, डोळ्यात चटणी टाकून चौघांवर तलवार-कोयत्याने वार

सांगली येथील वाळव्यात हवेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. (Firing in the air in Sangli)

सांगलीत हवेत गोळीबार, डोळ्यात चटणी टाकून चौघांवर तलवार-कोयत्याने वार
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 4:12 PM

सांगली : सांगली येथील वाळव्यात हवेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. जीवे मारण्याच्या उद्देशाने चार हल्लेखोरांनी डोळ्यात चटणी टाकून चार जणांवर हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी चार जणांवर तलवारीने आणि कोयत्याने वार करत त्यांना जखमी केलं आहे. (Firing in the air in Sangli, Sword and sickle attack on four people)

सांगली जिल्हयातील वाळवा येथे जीवे मारण्याच्या उद्देशाने डोळ्यात चटणी टाकून चार जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यावेळी तलवार आणि कोयत्याने चार जणांवर वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात चारही जण जबर जखमी आहेत. यामध्ये चार हल्लेखोर सहभागी होते. त्यापैकी एकाने हवेत गोळीबारही केला.

या हल्ल्यात अतुल अहिर, अंकुश अहिर, रोहन अहिर आणि प्रशांत अहिर हे चार जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी अतुल आणि अंकुशच्या डोक्यात आणि हातावर तलवारीने वार केले आहेत. या घटनेनंतर आष्टा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत, तर हल्लेखोर हल्ला करुन पळून गेले असून त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याचे जखमींच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा

पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशाने झाला? वाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट

मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?

Rinku Sharma Murder | ज्याच्या पत्नीला रिंकू शर्माने रक्त दिलं, त्यानेच जीव घेतला

(Firing in the air in Sangli, Sword and sickle attack on four people)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.