दुसरं लग्न का केलं? भावा-भावातील वाद टोकाला, हत्याकांडाने अमरावती थरारलं

दुसऱ्या लग्नाला भावाने विरोध केल्यामुळे दोघांमधील वाद चांगलाच विकोपाला गेला. त्यातून कैलासची भावानेच हत्या केली. (Amravati Man kills brother)

दुसरं लग्न का केलं? भावा-भावातील वाद टोकाला, हत्याकांडाने अमरावती थरारलं


अमरावती : दुसरं लग्न का केलं? यावरुन झालेल्या वादातून भावानेच भावाचा काटा काढला. अमरावतीत किरकोळ वादातून कैलास अजबे याला आपला जीव गमवावा लागला. हत्येप्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Amravati Man kills brother for second marriage)

पहिली पत्नी असताना दुसरं लग्न

अमरावती शहरातील हमलपुरा भागात ही घटना घडली. पहिल्या पत्नीला मूलबाळ होत नाही, म्हणून कैलास गणेश अजबे या तरुणाने दुसरं लग्न केलं होतं. मात्र दुसऱ्या लग्नाला त्याच्या भावानेच विरोध केला. भावा-भावांमधील वाद चांगलाच विकोपाला गेला. वादातून कैलासच्या भावानेच त्याची हत्या केली.

भावाशी वाद, भावाने काटा काढला

या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.

सख्ख्या भावांकडून चुलत भावाची हत्या

दोन सख्ख्या भावांनी चुलत भावाची खुलेआम हत्या केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी हैदराबादेत समोर आली होती. चुलत भावाची हत्या केल्यानंतर या दोघांनी त्याचं शीर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर ते कापलेलं शीर घेऊन ते स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचले आणि गुन्ह्याची कबुली दिली होती.

हे दृश्य पाहून पोलीस ठाण्यातील पोलीसही आश्चर्यचकित झाले होते. पोलिसांनी या दोन भावांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. या दोन्ही आरोपींच्या मते, त्यांचा चुलत भाऊ शेख सद्दाम त्यांचं ऐकत नव्हता म्हणून त्यांनी त्याची हत्या केली.

अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय

मयत शेख सद्दामचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. तिला हैद्राबादला तो घेऊन गेला आणि एके ठिकाणी त्याने तिला घरकामाला लावलं. त्यांना दोन मुलं आहेत. 2017 मध्ये शेख सद्दाम विवाहासाठी नकार देत असल्याने महिलेने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. या प्रकरणी हैद्राबादच्या सरुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

भावाची हत्या, कापलेले शीर घेऊन भाऊ पोलीस ठाण्यात

जुन्या प्रेमावरुन वाद, रागाच्या भरात प्रियकराकडून चाकूने वार, महिलेची प्रकृती नाजूक

मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी घराबाहेर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा 28 दिवसांनंतर मृतदेह सापडला

(Amravati Man kills brother for second marriage)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI