AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी घराबाहेर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा 28 दिवसांनंतर मृतदेह सापडला

शुभम फुटाणेचे 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करत असल्याचा मेसेज 16 जानेवारी रोजी त्याच्या कुटुंबियांना आला होता. (Chandrapur Youth Kidnap Murder)

मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी घराबाहेर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा 28 दिवसांनंतर मृतदेह सापडला
मयत शुभम फुटाणे
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 14, 2021 | 8:49 AM
Share

चंद्रपूर : मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी निघालेल्या तरुणाचा मृतदेह 28 दिवसांनंतर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तीस लाखांच्या खंडणीसाठी चंद्रपुरातील तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र तरुणाच्या सुटकेच्या आशेने डोळे लावून बसले असताना, जवळपास महिन्याभरानंतर त्याचा अर्धवट मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Chandrapur Youth Kidnap and Murder Case)

मित्रांसोबत पार्टीला जाण्यासाठी घराबाहेर

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरात राहणाऱ्या शुभम फुटाणे या तरुणाचे 28 दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. शुभम अमरावतीमध्ये अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. मित्रांसोबत पार्टीला जात असल्याचं कारण सांगून शुभम 16 जानेवारीला घरुन निघाला होता.

शुभमच्या अपहरणाचा कुटुंबीयांना मेसेज

शुभम फुटाणेचे 30 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करत असल्याचा मेसेज 16 जानेवारी रोजी त्याच्या कुटुंबियांना आला होता. त्याची बाईकही घुग्गुस शहरातच रस्त्याच्या कडेला आढळली होती.

शुभमचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत

चंद्रपूर पोलीस गेले काही दिवस अपहरणाबाबत अंधारात होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व दावे सपशेल अपयशी ठरले आहेत. घुग्गुस शहरातील शांतीनगर लेआउटमध्ये केवळ कवटी शाबूत असलेला अर्धवट जळालेला मृतदेह शनिवारी आढळला होता. त्यावरुन शुभम फुटाणेची ओळख पटवण्यात आली होती.

जुन्या अपहरण प्रकरणातील आरोपी अटकेत

विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात 6 वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. या मुलाच्या अपहरणाच्या प्रयत्नात अटक झालेला आरोपी गणेश पिंपळशेंडे यालाच पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी आणि मयत शुभम यांच्यात काय कनेक्शन होते, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. (Chandrapur Youth Kidnap and Murder Case)

व्यसनीपणाला कंटाळून आई-मुलाकडून बापाच्या खुनाची सुपारी

व्यसनाधीन झालेल्या पित्याला कंटाळलेल्या मुलाने आपल्या आईच्या मदतीने सुपारी देऊन पित्याचा खून केल्याची घटना तब्बल दीड वर्षानंतर उघडकीस आली आहे. 14 ऑगस्ट 2019 रोजी नांदेड शहरातील सरपंच नगर भागात शरद कुऱ्हाडे नावाच्या इसमाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात सापडला होता. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात कुऱ्हाडे यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली होती. परंतु संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर शरद कुऱ्हाडे यांच्या आत्महत्येचा बनाव उघड झाला.

संबंधित बातम्या :

महिलेला फेसबुकवरील मैत्री महागात, गोड बोलून नायजेरियन नागरिकाकडून साडे दहा लाखांचा गंडा

सांगलीत हवेत गोळीबार, डोळ्यात चटणी टाकून चौघांवर तलवार-कोयत्याने वार

(Chandrapur Youth Kidnap and Murder Case)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...