AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक… व्यसनीपणाला कंटाळून आई आणि मुलानेच दिली बापाच्या खुनाची सुपारी

शवविच्छेदन अहवालात कुऱ्हाडे यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यारांचे १४ वार होते. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. | Murder in Nanded

धक्कादायक... व्यसनीपणाला कंटाळून आई आणि मुलानेच दिली बापाच्या खुनाची सुपारी
शरद कु-हाडे दारूच्या आहारी गेले होते. नशेत असताना ते पत्नी आणि मुलाला मारहाण करायचे.
| Updated on: Feb 12, 2021 | 4:11 PM
Share

नांदेड: व्यसनाधीन झालेल्या पित्याला कंटाळलेल्या मुलाने आपल्या आईच्या मदतीने सुपारी देऊन पित्याचा खून (Murder) केल्याची घटना तब्बल दीड वर्षानंतर उघडकीस आली आहे. 14 ऑगस्ट 2019 रोजी नांदेड शहरातील सरपंच नगर भागात शरद कुऱ्हाडे नावाच्या इसमाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात सापडला होता. पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात कुऱ्हाडे यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली होती. (Murder mystery revealed in Nanded)

शवविच्छेदनानंतर अधिक तपासणीसाठी अहवाल प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. दरम्यानच्या काळात या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल तपास करण्याचे आदेश दिले. शवविच्छेदन अहवालात कुऱ्हाडे यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यारांचे 14 वार होते. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुन्हा चौकशीला सुरुवात केली. संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर शरद कुऱ्हाडे यांच्या आत्महत्येचा बनाव उघड झाला.

पत्नी आणि मुलानेच केली हत्या

शरद कु-हाडे दारूच्या आहारी गेले होते. नशेत असताना ते पत्नी आणि मुलाला मारहाण करायचे. दारुसाठी पैस मिळवण्यासाठी त्यांनी घरही विकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पत्नी अश्विनी कु-र्हाडे आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाने हत्येसाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिली. हत्येची सुपारी घेणारी मुलेही खून झालेल्या व्यक्तीच्या मुलाचे अल्पवयीन मित्र निघाले. पोलिसांनी पत्नी अश्विनी कुऱ्हाडे, सध्या 18 वर्ष वय असलेल्या तीन अल्पवयीन मुलांसह एकूण सहाजणांना अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

आईचा लग्नाला नकार, सोलापुरात तरुणाकडून आत्तेबहिणीचा गळा आवळून खून

चार दिवस दारु पाजून आदिवासी महिलेची गँगरेप करुन हत्या, पोलिसांनी शिताफीने आरोपींना पकडलं

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक

(Murder mystery revealed in Nanded)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.