अल्पवयीन मुलीचं अपहरण, बलात्कार नंतर हत्या; आरोपीच्या घराजवळ आढळला मृतदेह

आरोपीच्या घराजवळून एका तरूण मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीचं अपहरण, बलात्कार नंतर हत्या; आरोपीच्या घराजवळ आढळला मृतदेह
प्रातिनिधिक फोटो

हाजीपुर : महिला अत्याचाराही आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर तिचा खून झाल्याची घटना घडली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात कठारा पोलीस स्टेशन परिसरात हा प्रकार घडला. आरोपीच्या घराजवळून एका तरूण मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे. आधी आरोपींनी मुलीचं अपहरण केलं, त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला. (vaishali raped and murdered after kidnapping minor girl dead body found in pond )

खरंतर, पीडित तरुणी ही कथारा पोलीस स्टेशन परिसरातली रहिवासी आहे. शनिवारी रात्री उशिरा ती घरातून गायब झाली होती. बऱ्याच तपासानंतर कुटुंबीयांनी कथारा पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आरोपी म्हणून 6 जणांची नावं पुढे आली आहेत. धक्कादायक म्हणजे घटना घडताच आरोप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस जागोजागी छापा टाकत आहेत.

आरोपींच्या घराजवळच्या तलावातून सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

गुरुवारी सकाळी आरोपीच्या घराजवळ तलावात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू झाला. त्यांनी मृतदेह बाहेर काढला असून तो ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला. मृतदेहाची ओळख पटताच कुटुंबात अराजकता पसरली आहे.

शनिवारी झालं पीडितेचं अपहरण

शनिवारी रात्री तरुणीचं अपहरण करण्यात आलं. आणि 5 दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला, अशी माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. आरोपींनी याआधीही आरोपींनी असा धक्कादायक प्रकार केला होता. अपहरणानंतर महिलेवर अत्याचार आणि नंतर तिच्या हत्या असं कृत्य आरोपींकडून करण्यात आलं आहे.

आरोपींच्या शोधण्यासाठी सुरू छापेमारी

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपींना अटक करण्यासाठी जागोजागी छापेमारी करण्यात येत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. इतकंच नाहीतर या घटनेबाबत लोकांमध्ये तीव्र संताप आहे. (vaishali raped and murdered after kidnapping minor girl dead body found in pond )

संबंधित बातम्या –

व्हॅलेंटाईन वीकमध्येच प्रियकरानं संपवलं जीवन, प्रेयसीला बेड्या!

आईचा लग्नाला नकार, सोलापुरात तरुणाकडून आत्तेबहिणीचा गळा आवळून खून

चार दिवस दारु पाजून आदिवासी महिलेची गँगरेप करुन हत्या, पोलिसांनी शिताफीने आरोपींना पकडलं

(vaishali raped and murdered after kidnapping minor girl dead body found in pond )

Published On - 9:09 am, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI