AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेला फेसबुकवरील मैत्री महागात, गोड बोलून नायजेरियन नागरिकाकडून साडे दहा लाखांचा गंडा

एका नायजेरियन नागरिकाने महिलेला फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून तिला तब्बल साडे दहा लाख रुपयांना गंडविले आहे. (Nigerian citizen cheated  Borivali woman)

महिलेला फेसबुकवरील मैत्री महागात, गोड बोलून नायजेरियन नागरिकाकडून साडे दहा लाखांचा गंडा
या दोघांनी शेकडो महिलांना लुटल्याचा आरोप आहे .
| Updated on: Feb 13, 2021 | 4:20 PM
Share

मुंबई : बोरिवली पश्चिम येथील एका महिलेला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. एका नायजेरियन नागरिकाने या महिलेला फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून तब्बल साडे दहा लाख रुपयांना गंडविले आहे. या फसवणुकीबाबत पोलिसांनी मूळचा नायजेरियन नागरिक इफिनाई मदुकासी प्रिंस आणि त्याची साथीदार भारतीय महिला हेयो बोलो मेइंग यांना अटक केली आहे. (Nigerian citizen cheated  Borivali woman for ten lakh)

फसवणुकीसाठी भारतीय महिलेची मदत

मिळालेल्या माहितीनुसार मूळचा नायजेरियाचा इफिनाई मदुकासी प्रिंस हा भारतीय महिला हेयो बोलो मेइंग हिच्या मदतीने महिलांशी फेक अकाऊंद्वारे ऑनलाईन मैत्री करायचा. या महिलांशी सुरुवातीला चांगली मैत्री करुन नंतर त्यांची फसवणूक कारयचा. त्यासाठी या दोघांनी एकूण दहा फेक अकाऊंट चालू केले होते. ऑनलाईन पद्धतीने महिलांची फसवणूक करण्यासाठी नायजेरियन आरोपी आणि भारतीय महिला हेयो बोलो मेइंग ही मुंबई एयरपोर्टवर कस्टम ड्यूटी भरण्याच्या नावाखाली लाखो रूपये आनलाईन पद्धतीने मागायचे. त्यानंतर आनलाईन पैसे मिळाल्यानंतर ते दोघेही तत्काळ संपर्क तोडून देत होते.  अशाच प्रकारे बोरिवलीच्या तक्रारदार महिलेची फसवणूक करण्यात आली होती.

2 लॅपटॉप, 9 मोबाईल, 16 डेबिट कार्ड जप्त

बोरिवली येथील महिलेची फवसणूक झाल्यानंतर या महिलेने थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सापळा रचत दिल्लीच्या चंद्र विहार येथून नायजेरियन नागरिक इफिनाई मदुकासी प्रिंस आणि त्याची साथीदार भारतीय महिला हेयो बोलो मेइंग यांना अटक केली. यावेळी या दोघांकडून 16 डेबिट कार्ड, 10 पासबुक, 2 लॅपटॉप, 9 मोबाईल, 4 नवीन सिमकार्ड आणि 2 आंतरराष्ट्रीय सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, या दोघांनी लॉकडाऊनच्या दरम्यान अशा शेकडो महिलांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. या दोघांनी मिळून या काळात कोटींची लूट केल्याचाही पोलिसांना संशय आहे. या दोघांची चौकशी सुरु असल्याचे बोरीवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल कुंभार यांनी सांगितले असून ऑनलाईन पद्धतीने मिळणाऱ्या प्रलोभनांपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

इतर बातम्या :

तब्बल 1800 किलो गांजा जप्त, ड्रग्ज तस्करीचा छडा लागण्याची शक्यता

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

Rinku Sharma Murder | ज्याच्या पत्नीला रिंकू शर्माने रक्त दिलं, त्यानेच जीव घेतला

(Nigerian citizen cheated  Borivali woman for ten lakh)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...