बायकोच्या हट्टापाई नोकरी सोडली, गाडी लंपास करणाऱ्या आरोपीच्या नवी मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

OLX मध्ये गाड्या भाड्याने लावण्याची जाहिरात देऊन गाडी लंपास करणाऱ्या एका महाठगाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.

बायकोच्या हट्टापाई नोकरी सोडली, गाडी लंपास करणाऱ्या आरोपीच्या नवी मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

नवी मुंबई : OLX मध्ये गाड्या भाड्याने लावण्याची जाहिरात देऊन गाडी लंपास करणाऱ्या (Fraud Man Arrested By Police) एका महाठगाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. लग्न करुन आल्यावर बायकोचा घरी राहण्याच हट्ट शेल्डनच्या चांगलाच अंगलट आला आहे. मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असेलेला शेल्डनने नोकरी सोडून झटपट पैसे कमावण्याच्या नादात तो आता जेलमध्ये पोहोचला आहे. गाडी भाड्याने घेऊन गायब करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या नवी मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत (Fraud Man Arrested By Police).

OLX वर जाहिरात देऊन फसवणूक

शेल्डन वाझ हा महागड्या गाड्या कंपनीला लावण्यासाठी OLX वर जाहिरात देत असे. त्यामुळे चांगले चांगले लोक या जाहिरातींना बळी पडून या व्यक्तीला गाड्या देत असत. शिवाय, आपण योग्य ठिकाणी कार दिली, असा विश्वास बसावा यासाठी काही महिन्याचे भाडे शेल्डन वेळेवर देत होता. परंतू, त्यानंतर मात्र गाडीसह शेल्डन पलायन करुन गायब होत होता. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या.

गुप्त बातमीदारामार्फत 8 फेब्रुवारीला आरोपी एपीएमसी भाजीपाला मार्केट परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर सापळा रचून नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे (Fraud Man Arrested By Police).

37 लाख रुपयांचा मुद्दे माल जप्त

महिंद्रा एक्सयुव्ही 500, टाटा हेक्सा, कावासाकी झेड 800, बीएमडब्ल्यु, मारुती इरटिका असा एकूण 37 लाख रुपयांचा मुद्दे माल जप्त केला. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग, पोलीस सह आयुक्त जय जाधव, पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे पोलीस निरीक्षक बी. एस सय्यद आणि पोलीस शिपाई यांनी ही कामगिरी पार पाडली.

Fraud Man Arrested By Police

संबंधित बातम्या :

Rinku Sharma Murder | ज्याच्या पत्नीला रिंकू शर्माने रक्त दिलं, त्यानेच जीव घेतला

धक्कादायक ! मॅनहोलमध्ये लपलंय काय? तब्बल 21 लाखांचं सोनं, पोलीसही हैराण

अल्पवयीन मुलीचं अपहरण, बलात्कार नंतर हत्या; आरोपीच्या घराजवळ आढळला मृतदेह

Published On - 3:21 pm, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI