मरायचं ठरवूनच तरुणाने चक्क शेविंग ब्लेडचे 56 तुकडे गिळले, 7 डॉक्टरांकडून तीन तास ऑपरेशन; पुढे जे घडलं ते…

| Updated on: Mar 24, 2023 | 1:19 PM

नोकरीमुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या यशपाल नावाच्या 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने 56 ब्लेड गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तीन तासानंतर त्याच्या पोटातून ब्लेड काढण्यात आले आहेत.

मरायचं ठरवूनच तरुणाने चक्क शेविंग ब्लेडचे 56 तुकडे गिळले, 7 डॉक्टरांकडून तीन तास ऑपरेशन; पुढे जे घडलं ते...
चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: TV9 Network
Follow us on

जालौर : राजस्थानच्या जालौर येथे एक धक्कादायक घटना घडलीय. एका 24 वर्षीय तरुणाच्या पोटातून एक दोन नव्हे तर शेविंग ब्लेडचे 56 तुकडे काढले आहेत. या तरुणाने आत्महत्या करण्यासाठी हे भयंकर कृत्य केलं. हा तरुण सांचौर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो नोकरीमुळे त्रस्त होता. त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलले. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करून त्याच्या पोटातून ब्लेडचे तुकडे काढले आहेत. त्यामुळे तो बचावला आहे. त्याची प्रकृतीही धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

यशपाल राव असं या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बालाजी नगरमध्ये चार मित्रांसोबत राहतो. ब्लेडचे तुकडे गिळल्यानंतर या तरुणाला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्या पोटाचा एक्सरे काढण्यात आला. तेव्हा त्याच्या पोटात शेविंग ब्लेडच्या तुकड्यांचा ढिगाराच दिसला. त्यानंतर डॉक्टरांनी एंडोस्कोपी केली आणि नंतर ऑपरेशन करून एकापाठोपाठ एक करून शेविंग ब्लेडचे 56 तुकडे त्याच्या पोटातून बाहेर काढले.

हे सुद्धा वाचा

आणि रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या

रविवारच्या दिवशी त्याचे मित्र बाहेर गेले होते. ही संधी साधून त्याने ब्लेडचे तीन पॉकेट एकसाथ गिळले. त्यामुळे त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्याची तब्येत बिघडली. रक्ताच्या उलट्या झाल्याने तो घाबरला आणि त्याने आपल्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्याला शहरातील मनमोहन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तीन तास ऑपरेशन

डॉक्टर नरसी राम देवासी यांनी आधी एक्सरे काढला. त्यानंतर सोनोग्राफी केली. त्यात यशपालच्या पोटात बरेच ब्लेड आढळले. त्यानंतर ऑपरेशनची तयारी करण्यात आली. सात डॉक्टरांच्या टीमने तीन तास ऑपरेशन केलं. यशपालच्या पोटातून 56 ब्लेड काढण्यात आले.

नोकरीमुळे डिप्रेशन

सध्या यशपालची प्रकृती ठिक आहे. डॉक्टरही त्याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत. त्याच्या शरीरातील काही भाग डॅमेज झाला आहे. त्याला इंटरनल डॅमेज झाल्याने मेडिसीन दिली जात आहे. यशपाल हा नोकरीमुळे त्रस्त होता. नोकरीतील त्रासामुळे तो डिप्रेशनमध्ये होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला, असं सांगितलं जातंय.