Dombivli Crime : प्रमोशन होत नसल्याच्या रागातून शिक्षिकेच्या पतीचा मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला, रेल्वे ट्रॅकवर थेट..

डोंबिवली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षिकेच्या पतीने तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे. यामध्ये संबंधित मुख्याध्यापक जबर जखमी झाले. डोंबिवली ते खारबाव रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर हा हल्ला झाला.

Dombivli Crime : प्रमोशन होत नसल्याच्या रागातून शिक्षिकेच्या पतीचा मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला, रेल्वे ट्रॅकवर थेट..
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 8:40 AM

डोंबिवली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षिकेच्या पतीने तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे. यामध्ये संबंधित मुख्याध्यापक जबर जखमी झाले. डोंबिवली ते खारबाव रेल्वे स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर हा हल्ला झाला. याप्रकरणी हल्लेखोर पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

भागवत गुरव ( वय 56) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत . त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शकील शेख याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

का केला प्राणघातक हल्ला ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शकील शेख यांची प्तनी डोंबिवलीतील एका शाळेत शिक्षक असून भागवत गुरव हे तेथील मुख्याध्यापक आहे. मात्र शेख यांच्या पत्नीचे प्रमोशन आणि पगारवाढ रोखली गेली आहे. मुख्याध्यापकांनी खातेपुस्तक रोखून धरल्यानेच आपले प्रमोशन होत नसल्याचे त्या शिक्षिकेचे म्हणणे होते. आपल्या पत्नीची पगारवाढ रोखून त्रास देत असल्याच्या रागातून शेख यांना आला आणि त्याच रागातून त्यांनी हा हल्ला केला असे समजते.

घटनेच्या दिवशी, सोमवारी दुपारी मुख्याध्यापक गुरव हे डोंबिवलीकडून रेल्वे ट्रॅकमधून चालत खारबावच्या दिशेने जात होते. तेव्हा मागून आलेल्या शकील याने गुरव यांच्या छातीवर, मानेवर , गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये गुरव हे गंभीर जखमी झाले. ही घटना समजताच एकच खळबळ उडाली.

जखमी मुख्याध्यापक भागवत गुरव यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शकील शेख या आरोपीला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न करणे, धमकावणे अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास देखील करण्यात येत आहे

Non Stop LIVE Update
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?
चिन्ह वेगळं, नावात साम्य, तुतारीवरून संभ्रम? कोल्हेंचा हल्लाबोल काय?.
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका
2 दिवसात 6 सभा... मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, मोदींची काँग्रेसवर टीका.
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....