नागपूर-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, दोन महिलांसह 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू

| Updated on: May 06, 2022 | 3:24 PM

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नागपूर-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, दोन महिलांसह 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू
रिक्षामध्ये एकूण दहाजण होते
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोपरगाव – कोपरगाव (Kopergoan)तालुक्यातील डाऊच शिवारात कंटेनरची ॲपे रिक्षाला धडक जोराची धडक बसली. झालेला अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये दोन महिलांसह 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये जखमी झालेल्या इतर प्रवाशांवरती जनार्दन स्वामी रूग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नेमकं काय घडलं 

नागपूर-मुंबई महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील डाऊच शिवारात भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने अॅपे रिक्षाला जोराची धडक दिली. त्यावेळी रिक्षातून अनेक प्रवासी प्रवास करीत होते. हा अपघात इतका भयानक होता, की दोन महिलांसह चार विद्यार्थी जागीचं मरण पावले. या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.

मयतांची नावे

1) राजाबाई साहेबराव खरात वय 60 वर्षे
2) आत्माराम जम्मानसा नाकोडे वय 65 वर्षे
3) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुजा नानासाहेब गायकवाड वय 20 वर्षे
4) प्रगती मधुकर होन वय 20 वर्षे
5) शैला शिवाजी खरात वत 42 वर्षे
6) शिवाजी मारुती खरात वय 52 वर्षे

जखमींची नावे

1) विलास साहेबराव खरात वय 34 वर्षे
2) कावेरी विलास खरात वय 5 वर्षे
3) रुपाली सागर राठोड वय 40 वर्षे
4)धृव सागर राठोड वय 17 वर्षे
5) दिगंबर चौधरी वय 42 वर्षे
6) सर्वेश दिगंबर चौधरी वय 12 वर्ष
7) कृष्णाबाई गोविंद चौधरी वय 42 वर्षे