AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa Rape : सख्ख्या भावाचा बहिणीवर बलात्कार! गोव्यातील खळबळजनक घटना, नराधमाला अटक

Goa Crime News : या मुलीचं वय 19 वर्ष आहेत. या मुलीने आपल्या 24 वर्षांच्या भावावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.

Goa Rape : सख्ख्या भावाचा बहिणीवर बलात्कार! गोव्यातील खळबळजनक घटना, नराधमाला अटक
वाळपई पोलीस स्टेशनImage Credit source: Twitter
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jul 08, 2022 | 3:28 PM
Share

पणजी : बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सख्ख्या भावानेच आपल्या बहिणीवर बलात्कार (Brother raped sister) केल्याची घटना गोव्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण गोवा (Goa Crime News) हादरलाय. याप्रकरणी पोलिसांनी नराधम भावाला अटकही केली आहे. तर पुढील तपास केला जातो आहे. उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यामध्ये ही खळबळजनक घटना घडली. गुरुवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे एकदा नव्हे तर दोन वेळा पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. दहा दिवसांच्या आतच दोन वेळा पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न झाला होता. दुसऱ्या वेळी या पीडितेने कशीबशी आपली सुटका करुन घेत स्वतःचं वाचवलं. पोलिसांत (Goa Police) दाखल झालेल्या तक्रारीनंतर आता कारवाई करण्यात आली आहे. गोव्यातील एका स्थानिक दैनिकानं याबाबतचं वृत्त दिलंय.

सत्तरी तालुक्यातील वाळपई पोलिसांत एका पीडित मुलीकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. या मुलीचं वय 19 वर्ष आहेत. या मुलीने आपल्या 24 वर्षांच्या भावावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी केली जाते आहे.

दोन वेळा बलात्काराचा प्रयत्न

24 वर्षीय भावाना आपल्या सख्या बहिणीवर दोन वेळा अतिप्रसंग केला. 26 जून रोजी पहिल्यांदा पीडितेसोबत तिच्या सख्ख्या भावाने गैरकृत्य केलं. त्यानंतर 3 जुलैलाही त्याने असाच प्रयत्न केला होता. यावेळी कशीबळी पीडितेनं आपली सुटका करुन घेतली. अखेर हिंमत करुन वाळपई येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. 7 जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर अखेर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

सध्या संशयिताची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे. तसंच पीडितेचीही मेडिकल टेस्ट करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एकूण या घटनेमुळे संपूर्ण गोव्यात खळबळ माजलीये.

Follow Us
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली