AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Crime News : चमचम साडी, बोटात अंगठ्या, राहायची अशी की…गोविंद बर्गे प्रकरणातील पूजाची थक्क करणारी लाईफस्टाईल!

गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात आता पूजा गाकवाड हे नाव समोर आले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. तिच्या लाईफस्टाईलची आता सगळीकडे चर्चा होत आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Beed Crime News : चमचम साडी, बोटात अंगठ्या, राहायची अशी की...गोविंद बर्गे प्रकरणातील पूजाची थक्क करणारी लाईफस्टाईल!
pooja gaikwad and govind barge
| Updated on: Sep 17, 2025 | 3:45 PM
Share

Govind Barge Case : बीड जिल्ह्यातील लुखामसला या गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापुरातील बार्शी तालुक्यातल्या सासुरे या गावात स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. नर्तकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पूजा गोविंद बर्गे (Govind Barge) यांना बोलण्यास टाळाटाळ करत होती. यातूनच त्यांनी स्वत:ला संपवले आहे. दरम्यान, आता पूजा गायकवाडने गोविंद बर्गे यांच्याकडून सोने, दागिने तसेच पैसे घेतल्याचा दावा केला जातोय. असे असतानाच आता तिच्या लाईफस्टाईलबद्दल बोललं जातंय.

पूजाने इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडीओ केले पोस्ट

गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात पूजा गायकवाड या 21 वर्षीय नर्तकीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आत्महत्येची आता पोलीस सखोल चौकशी करत आहेत. एकीकडे ही चौकशी चालू असतानाच पूजाच्या इन्स्टाग्राम खात्यावरील पोस्टची चर्चा चालू आहे. पूजाने तिच्या खात्यावर काही व्हिडीओ पोस्ट केलेले आहेत. काही व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. तिचे हेच व्हिडीओ पाहून तिच्या लाईफस्टाईलबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

चमचम साडी, बोटात अंगठ्या

पूजा गायकवाड कलाकेंद्रात नृत्य करायची असे म्हटले जाते. तिने इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. यातील काही व्हिडीओंमध्ये पूजाने काळ्या, नारंगी रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे बहुसंख्या व्हिडीओंमध्ये पूजाच्या दोन्ही हातांच्या दहापैकी आठ बोटांत अंगठ्या असल्याचे दिसत आहे. पूजाच्या याच राहणीमानाची सध्या चर्चा होत आहे.

आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल, चौकशी सुरू

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आपली चौकशी चालू केली आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय-काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...