दुकानात आला, वेडवाकडं बोलू लागला.. जिम ट्रेनरने लोखंडी रॉड घेतला अन्..

जिम ट्रेनर तरुणी आणि तिच्या मित्राने एकाची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून हत्या केली. ही घटना दुपारी घडली आहे. हत्या केल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्या केल्याची कबुली दिली. पण मुळात हत्या केलीच का, तिथे काय घडलं ?

दुकानात आला, वेडवाकडं बोलू लागला.. जिम ट्रेनरने लोखंडी रॉड घेतला अन्..
क्राईम न्यूज
| Updated on: Aug 14, 2025 | 2:04 PM

पिंपरी -चिंचवड येथून एक धक्कादायक गुन्हा समोर आला आहे. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या चऱ्होली मध्ये जिम ट्रेनर तरुणीने तिच्या मित्राच्या मदतीने एका तरुणाची हत्याच केली. विशेष म्हणजे या गुन्ह्यानंतर त्या दोघांनी आपणहून पोलिस स्टेशन गाठत संपूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रम सांगत खुनाची कबुली दिली. यामुळे चांगली खळबळ माजली आहे.

जिम ट्रेनर तरुणी आणि तिच्या मित्राने एकाची लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून हत्या केली. ही घटना दुपारी घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी जिम ट्रेनर प्रांजल तावरे आणि यश पाटोळे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी दोघांना दिघी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दुकानात आला आणि..

मिळालेल्या माहितीनुसार, लल्ला उर्फ गोपीनाथ वरपे अस हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. जिम ट्रेनर आरोपी प्रांजल तावरे आणि यश पाटोळे यांचं दोघांमध्ये चऱ्होली येथे प्रोटीन पावडरचं दुकान आहे. मात्र घटनेच्या दिवशी हत्या झालेला लल्ला वरपे दुपारच्या सुमारास तिथे आला. तेथे येऊन तो प्रांजलशीला अश्लीलपणे बोलत होता, त्यामुळे दोघांमध्ये शाब्दीक वादही झाला. त्यानंतरलल्लाने शिवीगाळ केली, यामुळे प्रांजल तावरे आणि यश पाटोळे दोघेही खूप संतापले. त्यांनी जवळच असलेली पहार आणि लोखंडी रॉडने घेतला आणि त्याच्या सहाय्याने लल्ला याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

मारहाणीनंतर त्या दोघांनी थेट दिघी पोलीस ठाणे गाठलं आणि तिथे अधिकाऱ्यांना सगळं सांगत गुन्ह्याची कबुली दिली. तोपर्यंत लल्लाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला होता. या झटापटीत दोघे ही किरकोळ जखमी झाले आहेत. प्रांजल आणि यश पाटोळे दोघे ही जिम ट्रेनर आहेत. त्यांची लल्लासोबत आधीपासून ओळख असल्याची माहिती समोर आली आहे.

दिघी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.