AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता अंड्यांवर एक्सपायरी डेट लिहावी लागणार, नाही तर… नव्या नियमांनी अंडी विक्रेत्यांना मोठा चाप

पशुसंवर्धन विभाग आणि अन्न सुरक्षा विभागाने नवीन निर्देश जारी केले आहेत... प्रत्येक अंड्यांवर एक्सपायरी डेट लिहावी लागणार आहे... आता नव्या नियमांनी अंडी विक्रेत्यांना मोठा चाप बसणार आहे...

आता अंड्यांवर एक्सपायरी डेट लिहावी लागणार, नाही तर... नव्या नियमांनी अंडी विक्रेत्यांना मोठा चाप
Eggs
| Updated on: Mar 17, 2026 | 12:51 PM
Share

अंडी खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसांना देखील अंडी प्रचंड आवडतात. पण आतापर्यंत आपण खात असलेली अंडी आरोग्यास किती लाभदायक आहेत, हे आपल्याला माहिती नव्हतं. कारण ती अंडी किती दिवसांपासून साठवण्यात आली आहेत हे आपल्याला माहिती नसायचं. याच कारणामुळे पशुसंवर्धन विभाग आणि अन्न सुरक्षा विभागाने नवीन निर्देश जारी केले आहेत, आता विक्रेत्यांनी प्रत्येक अंड्यावर एक्सपायरी डेट लिाहावी लागणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने ग्राहकांच्या आरोग्याचं महत्त्व लक्षात घेत मोठा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून राज्यात प्रत्येक अंड्यावर उत्पादनाची अंतिम तारीख आणि एक्सपायरी डेट छापणं बंधनकारक असेल. याचा अर्थ असा की, दुकानदारांना आता जुनी किंवा खराब झालेली अंडी ‘ताजी’ म्हणून विकता येणार नाहीत.

मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंड्यांचा थेट संबंध मानवी आरोग्याशी आहे. पूर्वी अनेक ठिकाणी शिळी अंडी विकली जात असत आणि ग्राहकांना याची कल्पना नसायची. आता हा नियम लागू झाल्यामुळे पारदर्शकता येईल आणि लोकांना सुरक्षित अंडी उपलब्ध होतील.

अंडी किती दिवस राहू शकतात सुरक्षित?

सामान्य तापमान म्हणजे 30 डिग्री सेल्सियसवर अंडी फक्त 2 आठवडे खाण्या योग्य राहू शकतात… जर तुम्ही अंडी थंड वातावरणात म्हणजे 2 ते 8 डिग्री सेल्सियसवर ठेऊ शकत असाल तर, अंडी 5 आठवडे खाण्या योग्य राहू शकतात… पण अनेक दुकानदार अंड्यांची योग्य साठवणूक करत नाहीत… त्यामुळे ग्राहकांना आता तारीख बघून अंडी खरेदी करता येणार आहेत.

नियम मोडल्यास काय होईल?

जर कोणत्याही व्यापाऱ्याने किंवा दुकानदाराने नियमांचे उल्लंघन केल्यास, त्यांची अंडी जप्त केली जातील. नाहीतर ती नष्ट केली जातील किंवा मानवी सेवनासाठी असुरक्षित असल्याचे स्पष्टपणे चिन्हांकित केली जातील. यावर विभाग कठोर चौकशी करून कारवाई करेल.

ग्राहकांसाठी मोठा फायदा…

पूर्वी ग्राहकांना अंदाज बांधावा लागत होता की, अंडी किती जुनी आहे. जुनी अंडी खाल्ल्यामुळे अनेकांच्या आरोग्याचं नुसकान देखील झालेलं आहे… त्यामुळे ग्राहक आता अंड्यावर असलेली एक्सपायरी डेट पाहून अंडी खरेदी करु शकतील… हा नियम लवकरच राज्यभरात कडकपणे लागू केला जाईल. दुकानदारांना आणि उत्पादकांना आगाऊ तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील अन्नसुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.

Follow Us
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच....
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय.
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं.
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.