Divya pahuja Murder Case : ‘दिव्या लेस्बियन होती, मुलीची मागणी करत होती, आणि…’, हॉटेल मालकाचा खुलासा

| Updated on: Apr 04, 2024 | 12:10 PM

हॉटेलमध्ये असताना दिव्याने मुलीची मागणी केल्यानंतर त्याने दिल्लीवरुन मेधाला बोलवून घेतलं, असं अभिजीतने सांगितलं. अभिजीतच्या दाव्यावर दिव्याच्या कुटुंबीयांनी अजून कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीय. अभिजीतने त्याचे दिव्या सोबत अनैतिक संबंध असल्याच सांगितलं.

Divya pahuja Murder Case : दिव्या लेस्बियन होती, मुलीची मागणी करत होती, आणि..., हॉटेल मालकाचा खुलासा
Divya pahuja Murder Case
Follow us on

मॉडल दिव्या पाहुजा मर्डर केस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. दिव्यावर गोळी झाडणारा हॉटेल मालक अभिजीतच्या म्हणण्यानुसार, दिव्या समलिंगी होती. तिला मुलींमध्ये रुची होती. दिव्याने स्वत: मला ही गोष्ट सांगितली होती, असा अभिजीतचा दावा आहे. दिव्याने एका मुलीची मागणी केली होती. त्यानंतर अभिजीतने दिव्यासाठी मेधाला हॉटेलमध्ये बोलावल होतं. दिव्या पाहुजा मर्डर केसमध्ये बुधवारी कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. गुरुग्राम पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात अभिजीतची वक्तव्य आहेत. हॉटेलमध्ये असताना दिव्याने मुलीची मागणी केल्यानंतर त्याने दिल्लीवरुन मेधाला बोलवून घेतलं, असं अभिजीतने सांगितलं.

दिव्या त्याच्याकडे 30 लाख रुपयांची मागणी करत होती, असं सुद्धा अभिजीतच म्हणणं आहे. अभिजीतने आधीच तिला भरपूर पैसे मोजले होते. पण दिव्या वारंवार त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती. त्यामुळे त्याला राग आला. रागाच्या भरात त्याने दिव्याच्या डोक्यात गोळी झाडली. 2 जानेवारीला गुरुग्रामच्या हॉटेल सिटी पॉइंटमध्ये दिव्यावर गोळी झाडण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह फतेहाबादच्या भाखडा कालव्यात सापडला. आरोपी अभिजीतच्या दाव्यावर दिव्याच्या कुटुंबीयांनी अजून कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीय.

अभिजीतचे दिव्या सोबत अनैतिक संबंध

दिव्या बरोबर वर्ष 2014 मध्ये ओळख झाली. अभिजीतने त्याचे दिव्या सोबत अनैतिक संबंध असल्याच सांगितलं. दिव्याला मी नेहमीच पैसे द्यायचो. दिव्याला त्याने जवळपास 3.50 लाख रुपये दिले होते. यात 1.40 लाख रुपयाचा मोबाइल आणि बाकीची कॅश होती. ती आता आणखी जास्त पैसे मागत होती. दिव्याने 30 लाख रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दिव्याने त्याला धमकावल की, सगळ्या गोष्टी कुटुंबीय आणि मित्र परिवारासमोर उघड करण्याची धमकी दिली. त्यामुळे तो हैराण झालेला.

मिनी कूपर गाडीतून कुठे निघाले?

अभिजीतने सांगितलं की, “1 जानेवारीला पहाटे 3.15 वाजता मी बलराज आणि दिव्या मिनी कूपर गाडीतून गुरुग्राम हॉटेलसाठी निघालो. दुपारी दिव्याने सांगितलं की, लेस्बियन असल्याने तिला मुलगी हवी आहे. त्यावेळी मी मेधाला 3.30 वाजता फोन करुन हॉटेलवर बोलवून घेतलं. दिव्याची पैशाची मागणी संपतच नव्हती, म्हणून 2 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता दिव्याची डोक्यात गोळी झाडून हत्या केली.