
आतापर्यंत मुली किंवा महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची प्रकरण आपण ऐकली आहेत. पण गाजीपूरच्या मोहम्मदाबादमध्ये एका पत्नीनेच आपल्या पतीचा अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. सोबतच जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली. पतीने पत्नीवर हा आरोप करुन पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवला आहे. पतीने सांगितलं की, दोघांमध्ये एक कोर्ट केस सुरु आहे. त्यासाठीच पत्नी हे सर्व करतेय असा त्याचा आरोप आहे. मोहम्मदाबादच हे प्रकरण आहे. हलदरपुरच्या सुनीलने (बदलेलं नाव) पत्नी आणि पाच जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सुनीलचा आरोप आहे की, पत्नी सोशल मीडियावर सतत त्याचे अश्लील फोटो व्हायरल करतेय. जेव्हा नातेवाईकांनी सांगितलं की, तुझे अश्लील फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम आणि WhatsApp वर दिसतायत, तेव्हा सुनीलला या बद्दल समजलं.
सुनीलने याची चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की, या अशा हरकती दुसरं-तिसरं कोणी नाही त्याची पत्नीच करतेय. सुनील आणि त्याच्या पत्नीमध्ये कोर्टात एक खटला सुरु आहे. “जेव्हा मी पत्नीला सांगितलं की, हे फोटो डिलिट कर. अशा हरकती करु नकोस. त्यावेळी तिने मला उलटं धमकावलं. मी गुंडांना सुपारी देऊ तुझी हत्या घडवून आणीन अशी मला धमकी दिली” असं सुनील म्हणाला. “समाजात तुम्ही कुठे तोंड दाखवण्यालायक राहणार नाही. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला बरबाद करेन अशी सुद्धा तिने धमकी दिली” असं सुनील म्हणाला.
यामध्ये कोण-कोण सहभागी?
सुनीलने या संबंधी मोहम्मदाबाद पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार अर्ज देऊन एफआयआर दाखल करायला लावला. सोबतच त्याने आरोप केला की, ‘या सगळ्यामध्ये सासरा, पत्नीच्या मामाचा मुलगा आणि लग्न लावून देणारा मध्यस्थ यामध्ये सहभागी आहे’
पोलिसांनी काय सांगितलं?
सुनीलच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पत्नीसह एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनुसार, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोप योग्य आढळले तर दोषींविरोधात कारवाई केली जाईल.