AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदुत्वाचा विषय, ए. आर. रहमानच्या वादात अखेर नितेश राणेंची रोखठोक भूमिका

फिल्म इंडस्ट्रीत सांप्रदायिक मतभेद असल्याचं वक्तव्य करणारे ए. आर. रेहमान हे नुकतेच कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले. भाजप नेते नितेश राणे यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नेटफ्लिक्स आणि शोच्या निर्मात्यांसाठी त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे.

हिंदुत्वाचा विषय, ए. आर. रहमानच्या वादात अखेर नितेश राणेंची रोखठोक भूमिका
कपिल शर्मा, नितेश राणे, ए. आर. रहमानImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 02, 2026 | 1:45 PM
Share

जगप्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांच्या एका वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद अजूनही चर्चेत आहे. फिल्म इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे मला 8 वर्षे काम मिळालं नसल्याचं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. रहमान यांच्या या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीतील विविध कलाकारांनी आपली मतं मांडली. काहींनी त्यांच्यावर टीकाही केली. या सर्व वादानंतर आता कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांची उपस्थिती पहायला मिळत आहे. कपिल शर्मा शोच्या मंचावर रहमान यांना स्थान दिल्याबद्दल भाजप नेते नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. एक्स अकाऊंटवर त्यांनी याप्रकरणी पोस्ट लिहिली आहे. भारताची अखंडता, सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

नितेश राणे यांची पोस्ट-

‘कॉमेडी म्हटलं की नाव येतं कपिल शर्मा यांचं, आणि ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ला देश-विदेशात मोठी लोकप्रियता मिळाली आहे. मात्र ए. आर. रहमान यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे भारत, इतिहास आणि हिंदू समाजाच्या भावनांबाबत अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांना मोठ्या मंचावर स्थान देण्याच्या निर्णयाबाबत आम्ही तीव्र निषेध नोंदवतो. मनोरंजनाचं स्वातंत्र्य मान्य आहे. परंतु जनभावना, हिंदू समाजाच्या भावनांचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मता यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. नेटफ्लिक्स आणि शो निर्मात्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून समाजातील संवेदनशीलतेची दखल घ्यावी. कॉमेडी स्वागतार्ह आहे, पण भारताची अखंडता, सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही,’ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

विशेष म्हणजे ज्या एपिसोडचा नितेश राणे यांनी विरोध केला आहे, त्याच एपिसोडमध्ये रहमान त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. कपिलसोबत ‘मेसेज पासिंग’चा खेळ खेळताना ए. आर. रहमान यांनी म्हटलं की, हा खेळ या गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे की कशाप्रकारे एखादी गोष्ट एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत पोहोचता-पोहोचता पूर्णपणे बदलून जाते. त्यांनी याला ‘जगाची समस्या’ म्हणत संदेशांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो आणि पसरवला जाऊ शकतो, असं म्हटलंय.

काय म्हणाले होते रहमान?

‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रेहमान यांना इंडस्ट्रीतील पक्षपातीपणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी वैयक्तिकरित्या भेदभावाचा सामना केला नाही असं म्हणत अशा गोष्टींना इंडस्ट्रीतील बदलणारे पॉवर स्ट्रक्चर्स हे योगदान देणारे घटक ठरू शकत असल्याचं मत मांडलं होतं. “मला कदाचित याबद्दल कधी कळलंच नाही. कदाचित ते लपवलं गेलं असेल. पण मला यापैकी काहीही जाणवलं नाही. गेल्या आठ वर्षांत इंडस्ट्रीत बरीच सत्तांतरे झाली आहेत. जे लोक सर्जनशील नाहीत, त्यांच्याकडे आता सत्ता आहे. कदाचित ही एक सांप्रदायिक गोष्टदेखील असेल पण ती माझ्यासमोर दिसली नाही. मी कामाच्या शोधात नाही. मला कामाच्या शोधात जायचं नाही. मला काम माझ्याकडे यावं असं वाटतं. मी ज्यासाठी पात्र आहे, ते मला मिळेल”, असं वक्तव्य रेहमान यांनी केलं होतं.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...