AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवऱ्याला विवाहबाह्य संबंधाचा संशय, त्यानं जे केलं ते कधीही न ऐकलेलं !

या व्यक्तीला राग इतका अनावर झाला की त्याने आपल्या पत्नीच्या गुप्तांगाला तारेने शिवले. (Husband stitch wife private part)

नवऱ्याला विवाहबाह्य संबंधाचा संशय, त्यानं जे केलं ते कधीही न ऐकलेलं !
Crime News
| Updated on: Mar 21, 2021 | 3:35 PM
Share

लखनऊ : विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीच्या गुप्तांगाला तांब्याच्या तारेने टाके घातल्याची क्रूर घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील रामपूरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. तर पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. (Husband stitch wife private part in Uttar Pradesh)

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातील रामपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्ती त्याच्या पत्नीवर सतत अनैतिक संबंध असल्याचे संशय घेत होता. यामुळे त्या पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडण होत असे. काल (20 मार्च) शनिवारी त्या दोघांमध्ये याच कारणामुळे भांडण झाले. यावेळी पतीने संतापून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत महिला जखमी झाली. या व्यक्तीला राग इतका अनावर झाला की त्याने आपल्या पत्नीच्या गुप्तांगाला तारेने शिवले.

या सर्व धक्कादायक प्रकारानंतर महिलेची प्रकृती गंभीर झाली. याप्रकरणी महिलेने कोतावाली मिलक या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली आहे. सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे.

माझ्यावर वारंवार संशय

दरम्यान याप्रकरणी पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, माझा पती माझ्यावर वारंवार संशय घ्यायचा. तो मला पापी समजत होता. मी सकाळी सहा वाजता झोपलेली होती. त्यावेळी त्याने माझे हात, पाय बांधले. माझा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून त्याने तोंडाला कपडा बांधला. यानंतर त्याने तांब्याची तार घेऊन गुप्तांगाला टाके घातले.

दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीचा दावा

तर दुसरीकडे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पतीने हे सर्व आरोप मान्य केले आहेत. माझी पत्नी मला धोका देत होती. तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. मी सकाळी कामावर गेल्यानंतर ती बाहेर फिरायला जायची. याच रागात मी हे कृत्य केले. मी माझ्या पत्नीच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी मेहनत करतो. पण माझी पत्नी अशाप्रकारे वाईट कृत्य करत होती.

रामपूर जिल्हयातील घडलेली ही घटना अमानवी आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित खटला दाखल करण्यात आला. तसेच महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली आहे. यापुढे कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक शगुन गौतम यांनी दिली.  (Husband stitch wife private part in Uttar Pradesh)

संबंधित बातम्या : 

बदलापुरात तरुणाची तीन पाळीव कुत्र्यांसह आत्महत्या, कारण वाचून तुम्हीही हादराल!

डोंबिवलीत लव्ह, सेक्स अँड धोका, बारमधील वेटरकडून बारबालेची हत्या

लाखोंची डील करुन पैसे बळकावले, दोन वर्ष पोलिसांना चकवा, अखेर दिल्लीत दाम्पत्याला बेड्या

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.