डोंबिवलीत लव्ह, सेक्स अँड धोका, बारमधील वेटरकडून बारबालेची हत्या

वेटरने बारबालासोबत शारीरिक संबंध केले. त्यानंतर बारबालाची हत्या केली. हत्येनंतर वेटरने बारबालाच्या घरातील सामान चोरी केली आणि तो पसार झाला (Barbala killed by waiter in Dombivli).

डोंबिवलीत लव्ह, सेक्स अँड धोका, बारमधील वेटरकडून बारबालेची हत्या
बारमधील वेटरकडून बारबालेची हत्या

ठाणे : डोंबिवलीत महिलेच्या हत्येप्रकरणी कल्याण क्राईम ब्रांचने आरोपीला 16 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. मयत महिला ही बारबाला असून बारच्या वेटरनेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. वेटरने बारबालासोबत शारीरिक संबंध केले. त्यानंतर बारबालाची हत्या केली. हत्येनंतर वेटरने बारबालाच्या घरातील सामान चोरी केली आणि तो पसार झाला (Barbala killed by waiter in Dombivli).

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड परिसरात असलेल्या कुमार सोसायटीतील आरती सकपाळ या महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी सापडला. याची माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस आणि कल्याम क्राईम ब्रांचचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरती ही कल्याणच्या रुचिरा बारमध्ये बारबालाचे काम करीत होती. साडीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला (Barbala killed by waiter in Dombivli).

पोलिसांनी तपास कसा केला?

कल्याण क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजू जॉन यांनी हत्येचा छडा लावण्यासाठी काही पथक तयार केले. पोलीस अधिकारी भूषण दायमा, नितीन मुकदूम, मोहन कळंबकर पोलीस कर्मचारी गुरुनाथ जरक, दत्तात्रेय भोसले, राजेंद्र खिल्लारे, अजित सिंग राजपूत, मंगेश शिरर्के, सचिन वानखेडे यांच्या टीमने तपास सुरु केला.

तपासात धक्कादायक बाबी समोर

तपासा दरम्यान धक्कादायक बाब समोर आली. रुचिरा बारमध्ये जेव्हा क्राईम ब्रांचचे पोलीस सर्व वेटरची चौकशी करीत होते. तेव्हा एका वेटरचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी श्रीनिवास नडीवाल नावाच्या वेटरला ताब्यात घेतले. अखेर त्यानेच आरतीची हत्या केल्याचे कबूल केले. क्राईम ब्रांचने 16 तासाच्या आत हत्येचा छडा लावला आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

आरोपीने काही पैशांच्या देवाणघेवाणीतून केल्याचे म्हटले आहे. “हत्येच्या आधी वेटर श्रीनिवास याने आरती सोबत शारीरिक संबंध केले आणि नंतर तिची हत्या केली. घरातील समान घेऊन पसार झाला लुटीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजू जॉन यांनी दिली.

हेही वाचा : दीड वर्षाच्या चिमुकलीला कवेत घेऊन महिलेची विहिरीत उडी, चप्पल तरंगताना दिसल्याने थरारक घटना समोर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI