I Love You म्हण, तरुणीला रस्त्यात गाठत तरुणाची अजब मागणी, नकार मिळताच मग…

एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले अनेक ठिकाणी आपण पाहतोच. अशाच एका प्रकरणात तरुणाने तरुणीला रस्त्यात गाठले नि I Love You म्हण अशी गळ घातली. तिने नकार देताच मग या तरुणाने भयंकर कृत्य केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली

I Love You म्हण, तरुणीला रस्त्यात गाठत तरुणाची अजब मागणी, नकार मिळताच मग...
मग जबरी धक्का
| Updated on: Aug 07, 2025 | 12:28 PM

तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने भयंकर कृत्य केले. त्याने मुलीला रस्त्यातच गाठले. मग तिला त्याने I Love You असं धमकावलं. अचानक झालेल्या या घडामोडी तरुणी एकदम भाबांवली. मुलीने असं काही बोलण्यास थेट नकार दिला. तिने मुलाला चांगलेच सुनावले. तिने असे प्रकार न करण्यास सांगितले. प्रेमास नकार मिळताच या तरुणाने मग भयंकर कृत्य केले.

हा प्रकार राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील आहे. मंड्रेला पोलीस ठाण्यातंर्गत ही घटना घडली. 22 वर्षीय तरुणीला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. तिच्या कुटुंबियांनी सांगितले की, घराशेजारी राहणारा प्रमोद हा मुलीवर मैत्री करण्यासाठी अनेक दिवसांपासून दबाव टाकत होता. तिला त्याने अनेकदा रस्त्यात गाठत आय लव्ह यू म्हण अशी गळ घातली होती. त्यादिवशी त्याने पुन्हा तेच कृत्य केले. तिला रस्त्यात गाठले. त्याने पुन्हा आय लव्ह यू साठी दबाव टाकला. त्यावेळी चिडलेल्या मुलीने त्याला चांगलेच सुनावले. तिने असे करण्यास नकार दिला. मग तरुण त्या ठिकाणावरून निघून गेला. पण त्याच्या मनात राग कायम होता.

मग केला थेट चाकू हल्ला

5 ऑगस्ट रोजी तरुणी घरात एकटीच असल्याचे त्याने पाहिले. तिची आई दुसऱ्या गावाला गेली होती. तर वडील हे शेतात काम करत होते. ही संधी साधून प्रमोद थेट घरात घुसला. त्याने पुन्हा आय लव्ह यू म्हणण्याचा हट्ट धरला. तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. मग तरुणीने आरडाओरड केली. घाबरून प्रमोद तिथून पळाला.

थोड्यावेळाने तरुणी शेताकडे गेली. तिथे तिने गुरांना चारापाणी केले. आरोपी तिच्या मागावरच होता. त्याने तिला पुन्हा रस्त्यात गाठले. आय लव्ह यू म्हणण्याची जिद्द केली. तरुणीचाही पारा चढला. पण यावेळी प्रमोदच्या मनात वेगळेच काही होते. त्याने तरुणीच्या मानेवर, डोक्यात, खांद्यावर, पोटात, पाठीत आणि हातावर चाकूचे सपासप वार केले.

तरुणीने आरोडाओरड करताच आजूबाजूच्या शेतात काम करणारे लोक धावले. लोक मारायला येत असल्याचे पाहताच आरोपीने स्वतःवर पण चाकूने वार केले आणि सोबत आणलेले विष पिले. तरुणीची आणि प्रमोद सध्या धोक्याबाहेर आहेत. दोघेही नात्यात आहेत. दोघांचे शेत जवळ जवळच आहे. तर घरही शेजारी आहेत. यापूर्वी या दोन्ही कुटुंबात कधीच वाद झाले नाही. या घटनेने दोन्ही कुटुंबाना धक्का बसला आहे.