मुलगी बनून बनवायचा रिल्स, अचानक घेतला जीवन संपवायचा निर्णय, विचित्र घटनेने खळबळ

मुलीचे कपडे घालून रिल्स बनविण्याची सवय असलेल्या एका दहावीच्या मुलाने आईने रागावल्याने स्वत: ला संपविल्याचे घटना घडली आहे.

मुलगी बनून बनवायचा रिल्स, अचानक घेतला जीवन संपवायचा निर्णय, विचित्र घटनेने खळबळ
crime scene
| Updated on: Feb 02, 2025 | 12:21 PM

तो मुलीचे कपडे घालून अगदी त्यांच्यासारखे नटून थटून रिल्स बनावयाचा आणि विविध सणाच्या निमित्ताने मुलीच्या वेषातील त्याचे व्हिडीओ तो इंस्टाग्राम आणि युट्युबवर लोड करत असायचा. त्याने अशाच प्रकारे अनेक रिल्स बनवून सोशल मीडियावर लोड केले होते. परंतू अचानक त्याने शेवटचा व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकला आणि स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला. या घटनेने खळबळ उडाली आहे. दहावीत शिकणाऱ्या या मुलाने असा निर्णय का घेतला याची चर्चा सुरु आहे.

सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळे व्हिडीओ अपलोड करीत असतात. त्यातून त्यांना लाईक्स आणि शेअरचा जणू चस्काच लागलेला असतो. अशाच एक तरुण मुलींचे कपडे घालून रिल्स बनवायचा आणि सोशल मीडियावर अपलोड करीत असायचा. परंतू या दहावीत शिकणाऱ्या तरुणाने अचानक जीवन संपविल्याने बिहारच्या बेगूसराय परिसरात खळबळ उडाली आहे.दरियापूर येथील गावातील रहिवासी अंकित कुमार ( वय १७ ) याला मुलीच्या कपड्यात रिल्स बनविण्याचा छंद लागला होता. त्याने इंस्टाग्राम, फेसबुक , युट्युबवर अनेक व्हिडीओ अपलोड केले होते. सर्व व्हिडिओ त्याने मुलीच्या गेटअपमध्ये चित्रित केले होते.

स्वभावाने चांगला होता

शनिवारी ( १ फेब्रुवारी ) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंकीत कुमार याचे आईशी भांडण झाले होते. त्याच्या आईने त्याला रिल्स बनविण्यावरुन रागाविल्याने त्याने घराचा दरवाजा बंद करून स्वत:ला गळफास लावून संपवले. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना घराचा दरवाजा तोडला. या प्रकरणात नयागाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या मुलगा स्वभावाने चांगला होता. कोणालाही त्याच्या विषयी तक्रार नव्हती. आईने मुलींचे कपडे का घालतो असे बोलल्याने त्याला सहन झाले नाही आणि त्याने स्वत:ला संपवले.